Type Here to Get Search Results !

चांदणी चौकाजवळ पुन्हा पिस्तुलासह सराईत गजाआड; दोन महिन्यात त्याच ठिकाणी दुसरी कारवाई

 

पुणे, दि. ३० (चेकमेट टाईम्स): पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी शहरात अस्तित्वात असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्याचे सक्त आदेश देऊन ठोस कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांची सर्वच पथके कामाला लागली असून, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने पुन्हा एकदा चांदणी चौकाजवळून एकाला गावठी कट्टा आणि काडतुसासह अटक केली आहे. दोन महिन्यात त्याच भागात झालेली ही दुसरी कारवाई आहे.

 चांदणी चौकाजवळ गावठी कट्ट्यासह एकजण गजाआड; गुन्हे शाखेची कारवाई

जून अखेरीस पौड रस्त्यावरील चांदणी चौकाजवळ असलेल्या लोहिया जैन आयटी पार्कजवळून सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने गावठी कट्टा आणि दोन काडतुसांसह ताब्यात घेतले होते.



आता पुन्हा रविवार दि.२९ ऑगस्ट २०२१ रोजी, गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची गस्त चालू असताना, अंमलदार राजेश टेकावडे यांना मिळालेल्या बातमीवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक बाळासाहेब काजळकर (वय.२७, रा.सुतारदरा, कोथरूड, पुणे) यास चांदणी चौकाजवळील लोहिया जैन आयटी पार्क समोरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळून ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आर्म अॅकट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बाणेरकरांचे ४३ वर्षांचे स्वप्न होतेय साकार; शिवरायांचे अद्ययावत स्मारक घेत आहे आकार

सदरील कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ रवींद्र शिसवे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे प्रतिबंधक) सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,  पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे, विल्सन डिसोझा, राजेश टेकवडे, सोनम नेवसे यांच्या पथकाने केली.

 दहीहंडी उत्सव रद्द केलेल्या या पुणेकर मंडळाने घालून दिलंय एक वेगळा आदर्श; नेमकं काय केलंय पहाच

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.