Headlines
Loading...
वारजे मध्ये मोटारीने ठोकरल्याने पादचाऱ्याचा मृत्यू; मोटारचालक अपघात करून पसार

वारजे मध्ये मोटारीने ठोकरल्याने पादचाऱ्याचा मृत्यू; मोटारचालक अपघात करून पसार

 

पुणे, दि. ३१ (चेकमेट टाईम्स): वारजे मध्ये रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला अज्ञात मोटारीने ठोकरल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोटारचालक अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झाला असून, त्याच्याविरोधात वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


रविवार दि.२९ ऑगस्ट २०२१ रात्री आठच्या सुमारास वारजे मधून गेलेला मुंबई बेंगलोर महामार्ग ओलांडत असताना, प्रकाश ज्ञानोबा शेळके (वय.३९ रा.रामनगर, वारजे, पुणे) यांना पांढऱ्या रंगाच्या अज्ञात मोटारीने उडवल्याने ते जखमी होऊन, त्यांचा मृत्यू झाला. अपघात केल्यानंतर मोटार चालकाने अपघातग्रस्त प्रकाश शेळके यांची मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव तपास करत आहेत. सहायक पोलीस फौजदार एस एस पाठक यांनी फिर्याद दिली आहे.

 वारजे महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात हेल्मेट फुटून दुचाकीस्वाराचा मृत्यू

वारजे मधून गेलेला मुंबई बेंगलोर महामार्ग असो की कोणताही महामार्ग तो ओलांडणे तसे धोक्याचेच काम. मात्र अनेकजण लांबचा वळसा नको म्हणून, मधूनच जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. त्यांच्या याच कृतीतून कधीतरी दुर्घटना घडते आणि व्यक्ती जीवाला मुकते. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने वारजे मधील चर्च ते पोलीस स्टेशनला जोडणारा कॅनॉल रस्ता अथवा पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग करणे गरजेचे आहे. ज्यामुळे एखाद्या कुटुंबाचा कायमचा आधार जाण्यापासून वाचू शकतो.

 शालेय विद्यार्थ्यांनी वारजेच्या वाहतुकीवर बनवला आराखडा; विद्यार्थ्यांना आहे सायकल ट्रॅकची गरज

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


0 Comments: