Type Here to Get Search Results !

महिलेच्या पर्स मधील लाखभर रुपये लांबवले; पौड रोडवरून जाणाऱ्या पीएमपी बसने महिला करत होती प्रवास

 

पुणे, दि. ३१ (चेकमेट टाईम्स): पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईल, पर्स, पाकिटांच्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, एका महिलेला अशाच एका चोरीच्या घटनेला सामोरे जावे लागले असून, तिचे जवळपास लाखभर रुपये यामध्ये चोरी झाले आहेत.



सदरील पिरंगुट, ता. मुळशी, जि.पुणे येथे राहणारी ४० वर्षे वयाची महिला आपल्या मुलासोबत सोमवार दि.३० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान पीएमपीएमएल बसने घोटावडे फाटा ते विमलाबाई गरवारे शाळा, डेक्कन दरम्यान प्रवास करत असताना, अद्यात चोरट्याने त्यांच्या पर्स मधील तब्बल ९६ हजार ५०० रुपयांची रोकड काढून चोरून नेली. त्या बसमधून खाली उतरून आल्यावर त्यांच्या पर्समध्ये रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 चालक नसताना पीएमपीएमएलची बंद बस धावली उलट; सुदैवाने जीवितहानी टळली

याबाबत महिलेने डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बसमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत असून, खिशातील मोबाईल, पाकिटे काढून घेणे, महिलांच्या पर्स मधील ऐवजावर डल्ला मारण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवासी नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे.

 वारजे माळवाडी मध्ये डोंगरावरून बस ढासळली; सुदैवाने जीवितहानी टळली

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.