Headlines
Loading...
वारजे कर्वेनगर मध्ये विरेश शितोळे यांच्याकडून ज्येष्ठांसाठी बाकड्यांची व्यवस्था | Benches by Viresh Shitole

वारजे कर्वेनगर मध्ये विरेश शितोळे यांच्याकडून ज्येष्ठांसाठी बाकड्यांची व्यवस्था | Benches by Viresh Shitole

 

पुणे, दि. २७ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक बाकडे, कचऱ्याचे डब्बे, पिशव्या अशा अनेक कामांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करतात. मात्र त्यांनी वाटप केलेले अथवा कागदावर दिसत असलेले बाकडे, कचऱ्याचे डब्बे, पिशव्या प्रत्यक्षात दिसतातच, नागरिकांना त्याचा लाभ मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी या प्राथमिक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करतात.

 

मेट्रो रेल्वे करण्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करा; वारजे, शिवणे, उत्तमनगर मधील नागरिकांची मागणी


अशाचप्रकारे वारजे कर्वेनगर (Warje Karvenagar) परिसरातील दुधाणे नगर (Dudhane Nagar) मध्ये असलेल्या गोल्डन पेटल्स (Golden Petals) या सोसायटी मध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानचे विरेश शितोळे (Viresh Shitole) मित्र परिवाराच्या वतीने २ स्टेनलेस स्टील मध्ये सोफा बेंच बसवून देत, ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी गोल्डन पेटल्सच्या रहिवाश्यांनी विरेश शितोळे यांचे आभार मानत, ज्येष्ठांची गरज ओळखून सोय केल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

 

वारजे बदलतंय; बघा नगरसेवक सचिन दोडके यांच्या कामाबद्दल काय म्हणत आहेत वारजेकर


वरील वृत्त आपल्या खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


0 Comments: