Type Here to Get Search Results !

विरोधक असलो तरी विकासकामांसाठी निधी कसा मिळवायचा हे आम्हाला माहीत आहे: दिपाली धुमाळ

 

पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): “तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी हेच शिकवल का?” हे एखाद्याला बोलणं म्हणजे शिक्षकांना शिवी देणं आहे. त्यामुळे कोणीही आपली वर्तणूक आपल्या शिक्षकांना बोल लागेल अशी होणार नाही याकडे लक्ष्य दिले पाहिजे. सायली वांजळे यांनी आपल्या कारकीर्दीच्या पहिल्याच सत्रात नवख्या असूनही केलेलं काम कौतुकास्पद आहे. त्यांच्यावर त्यांच्या शिक्षकांनी केलेले संस्कार चांगले असल्याने त्या शिक्षक आणि शाळेसाठी जीव तोडून काम करताना दिसतात, त्याला नागरिकांनी साथ दिली पाहिजे असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केले.


 ... अबब पुणे महानगरपालिकेत हे चाललंय काय? आयुक्तांसह सत्ताधाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज


नगरसेविका सायली वांजळे यांच्या प्रयत्नातून न्यू अहिरेगावात साकारण्यात येत असलेल्या स्व. सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे ई- लर्निंग स्कूलच्या नवीन इमारतीच्या उर्वरित कामाचा भूमिपूजन समारंभ शिक्षकदिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापिका समिना शेख, सुमेधा कुलकर्णी, जया वाल्हेकर, मुख्याध्यापक महेंद्र दळवी यांच्यासह शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे, हर्षदा वांजळे, मसापचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


सिंहगड रस्ता वाहतूक कोंडीत गुदमरणार; उड्डाणपुलाचा निधी वळवला? | राष्ट्रवादी करणार आंदोलन

 

यावेळी पुढे बोलताना दिपाली धुमाळ यांनी, आम्ही पुणे महानगरपालिकेत विरोधात असलो तरी, “आम्हाला आपल्या भागाच्या विकासासाठी निधी कसा आणायचा हे माहित झालेलं आहे”. आम्ही आमच्या मतदारांच्या मतांचा आदर करत आलेलो आहोत आणि त्यासाठी २४ तास काम करत असतो. विरोधी पक्षात असतानाही या ई लर्निंग स्कूलला निधी मिळवल्याने, आज शाळेच्या दुसऱ्या टप्प्याचे देखील काम चालू झाले आहे. भविष्यात पुणे महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यास, अशी विकासाची कामे आणखीन वेगाने आणि मोठ्या प्रमाणात होतील असा विश्वास दिपाली धुमाळ यांनी यावेळी व्यक्त केला.


कोरोनावर मात करून आलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे सुप्रिया सुळे यांनी हटके अंदाज मध्ये केले कौतुक

 

आपल्या प्रास्ताविकात नगरसेविका सायली वांजळे यांनी, शाळेत कशा पद्धतीच्या सुविधा असाव्यात हे शिक्षकांनी सुचवल्याप्रमाणे करत असल्याचे सांगितले. नगरसेवकांपेक्षा शिक्षकांनाच माहीत असते की मुलांना काय हवे असते. त्यामुळे शिक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे शाळा तयार होईल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊन, त्यांची गुणवत्ता वाढेल. आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांनी राज्यात, देशातच नव्हे तर जगात नावलौकिक मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त करताना, त्यांच्या भविष्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सायली वांजळे यांनी सांगितलंय.


तुमची शरद पवारांचे नाव घ्यायची औकात नाही; भाजपा नगरसेवकावर राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते संतापले

 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून लता कांबळे, कल्पना ढमढेरे, अश्विनी नवले तारकेश्वरी हुलावळे, अनिता हेळकर, संगीता इंगवले, संतोष गुंजाळ, संध्या शिंदे, सुवर्णा महामुनी, हेमलता भुजबळ, माया पानसरे, लता जवंजाळ, वर्षा मोरे, गौरी वडगावकर, वंदना इंगळे, अनुराधा अग्रवाल, सुनंदा हांडे, निशा बेंगाळ, प्राजक्ता शिंदे, आशा वांजळे, छाया ननवरे, सुचिता गायकवाड, साधना गलांडे, सुरेखा जाधव या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


 सायली वांजळे यांच्या २.५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण


वरील वृत्त आपल्या खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.