Headlines
Loading...
कबड्डी’वर पीएचडी केलेल्या शिक्षिकेचा लक्ष्मी दुधाने यांच्या माध्यमातून सत्कार | Laxmi Dudhane Falicitate Vidya Pathare

कबड्डी’वर पीएचडी केलेल्या शिक्षिकेचा लक्ष्मी दुधाने यांच्या माध्यमातून सत्कार | Laxmi Dudhane Falicitate Vidya Pathare

 

पुणे, दि. २७ (चेकमेट टाईम्स): पीएचडी करून डॉक्टरेट मिळवण्यासाठी अनेकजण जीवाचे रान करतात. रात्रंदिवस अभ्यास करतात. त्याचे अहवाल सादर करतात. त्याचे विश्लेषण करतात. पण काही असे विषय असतात, त्याचा सखोल अभ्यास अतिशय अवघड आणि किचकट असतो. मात्र एका वेगळ्या प्रकारच्या जिद्दीने पछाडलेली मंडळी असेच विषय घेऊन यशस्वी होतात. अशा व्यक्तिमत्वांचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत केले जाते असे नाही. मात्र त्याला अपवाद आहेत त्या वारजे कर्वेनगर प्रभागाच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने  (Lakshmi Dudhane)आणि त्यांचे उच्चशिक्षित चिरंजीव स्वप्नील दुधाने (Swapnil Dudhane).

 

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने केला ताडीगुत्ता उध्वस्त; पालखीच्या पार्श्वभूमीवर नगरसेविकेचा रौद्रावतार


नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्या वतीने एम एच स्पोर्ट्स अकॅडमी (M H Sports Academy) यांच्या संयुक्त विद्यमाने अशाच एका कर्तुत्ववान शिक्षिकेचा आगळा वेगळा सत्कार सत्कार करण्यात आलाय. त्या शिक्षिकेचे नाव आहे विद्या पाठारे हनवंते. (Vidhya Pathare Hanwante)


आरोग्य तपासणीच नव्हे, तर ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी देखील मोफत; लक्ष्मी दुधाने यांचा उपक्रम

 

शारीरिक शिक्षण संचालिका प्राध्यापक विद्या पाठारे हनवंते या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या शिक्षिका असून, लक्ष्मी दुधाने नगरसेविका असलेल्या कर्वेनगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातून "राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंचा कार्यमानाचा विश्लेषणात्मक अभ्यास" या विषयावर नुकतीच पीएचडी व्हायवा झाली. या पीएचडीच्या अभ्यासामध्ये त्यांना कुटुंबातील सर्व व्यक्तींनी खूप सहकार्य केले व पाठिंबा दिला. त्यामुळे आपल्याला यश मिळाल्याचे विद्या पाठारे हनवंते सांगतात.


पुण्यात पुन्हा एकदा पुतळ्यांचे राजकारण; कर्वे पुतळा स्मारकावरून राष्ट्रवादीचे आंदोलन

 

तर त्यांनी मिळवलेल्या यशावर बोलताना लक्ष्मी दुधाने यांनी “शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी” या ओवीचा दाखला देत, आई वडिलांनी केलेल्या चांगल्या संस्कारांचे फलित म्हणून विद्या पाठारे हनवंते यांना ही पदवी प्राप्त करता आली. कष्ट करण्याची तयारी असलेल्यांना अपयश येत नाही आणि कष्ट करण्याची तयारी असलेल्यांसाठी नगरसेविका म्हणून आपल्याला जे जे करता येईल, ते ते करत आलो आहोत. भविष्यातही करत राहू असे अभिवचन यावेळी दुधाने यांनी दिले. स्वप्नील दुधाणे यांनी विद्या पाठारे हनवंते यांना शुभेच्छा देतानाच, त्यांच्या यशाचा फायदा प्रभागातील विद्यार्थ्यांना होण्यासाठी आवश्यक ते धोरण अवलंबण्याचे सुतोवाच केले.


पुणे मनपा’च्या पहिल्या ओपन लायब्ररीचे डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते लोकार्पण; शहरात पुस्तक चळवळ उभी

 

वरील वृत्त आपल्या खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


0 Comments: