Headlines
Loading...
संदीप यादव यांची माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या संघटकपदी निवड

संदीप यादव यांची माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या संघटकपदी निवड

 

पुणे, दि. २८ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात राहत असलेले युवा कार्यकर्ते संदीप काळूराम यादव (Sandip Kaluram Yadav) यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल, भारतीय महा क्रांती सेना व यूएन न्यूज-24 सलग्न, माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या संघटक पदी निवड झाली आहे. (Organizer of the International Organization for Human Rights Ambassadors, the Global Peace Council, the Indian Revolutionary Army and the UN News-24 affiliate, the Right to Information Police Friend and the Journalist Protection Army)

 

संदीप यादव यांची सामाजिक क्षेत्रातील कार्य प्रणाली पाहून त्यांना हे पद देण्यात आलेले आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडवण्याचे व संघटनेची विचारधारा यशस्वी करण्याची जबाबदारी यादव यांच्यावर देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभूळकर यांनी म्हटलंय. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पद संदीप यादव यांना प्रदान करण्यात आले आहे.

 

संदीप यादव हे वारजे माळवाडी (Warje Malwadi) तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये  (Khadakwasla Constituency)आपल्या चांगल्या प्रकारच्या सामाजिक कार्याबद्दल प्रसिद्ध आहेत. वंदे मातरम अभिनव संघटनेच्या (Vande Mataram Abhinav Sanghatana) माध्यमातून त्यांनी क्रांतिकारक, महापुरुष, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील महान विभूतींचा सन्मान राखत एक आदर्शवत कार्य करून दाखवलं होतं. त्या पार्श्वभूमीवर यादव यांना हे पद देण्यात आले आहे. आगामी काळात आपण समाजहितासाठी यापुर्विपेक्षा अधिक जोमाने अहोरात्र काम करू असा संकल्प यादव यांनी यावेळी केलाय.

 

वरील वृत्त आपल्या खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक :

आमच्या युट्युब’ची लिंक :

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक :

आमच्या ट्विटर’ची लिंक :


0 Comments: