Type Here to Get Search Results !

कोजागिरीच्या पार्श्वभूमीवर वारजे कर्वेनगर मध्ये मोफतच्या दुधाचा महापूर; विक्रीवर मात्र परिणाम

 

पुणे, दि. १९ (चेकमेट टाईम्स): आगामी २०२२ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वारजे कर्वेनगर भागात दुधाचा महापूर आला असून, नागरिकांना यंदाच्या कोजागिरीला फुकटात दुध प्यायला मिळणार आहे. अनेक इच्छुक आणि विद्यमान उमेदवारांचे या दुध वाटपात सातत्य देखील असून, काहींनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फंडे आजमावले आहेत. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये दारूचे महापूर येत असतं आणि आता दुधाचे येत आहेत, हा एक सकारात्मक बदल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचा अर्थ दारूचा वापर कमी झालाय असा नसून, काही जण दारू पाजून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करतात, हे त्रिकालबाधित सत्य आहेच.

 

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वारजे माळवाडी प्रभाग ३२ मधील नगरसेवक सचिन दोडके यांनी तर कहरच केला असून, तब्बल १० हजार लिटरच्या टँकरभर दुधाचे वाटप ते नागरिकांना करणार आहेत. त्याचबरोबर इतरही काही सरप्राईज असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, चेकमेट टाईम्सच्या दर्शकांना याबाबतचा सविस्तर व्हिडीओ उद्या चेकमेट टाईम्सच्या युट्युब, फेसबुक आणि डेली हंट’वर पाहायला मिळणार आहे.

 


वारजे माळवाडी प्रभाग ३२ मधील इच्छुक उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे आणि अर्चना पराग ढेणे यांनी ३१ डिसेंबर रोजी “दारू नको दुध प्या” असा उपक्रम राबवत २ हजार लिटर गरमा गरम मसाला दुधाचे वाटप केले होते. आज पुन्हा ते कोजागिरी निमित्त वारजे रामनगर गणपती माथा भागात तब्बल २० ठिकाणी “गरमा गरम मसाला दुधाचे वाटप” करणार आहेत. चेकमेट टाईम्सच्या दर्शकांना याबाबतचा सविस्तर व्हिडीओ उद्या चेकमेट टाईम्सच्या युट्युब, फेसबुक आणि डेली हंट’वर पाहायला मिळणार आहे.

 


वारजे कर्वेनगर प्रभाग ३१ मधील इच्छुक उमेदवार आणि राजमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा ते सात वर्षांपासून “नागरिकांच्या हाकेला ओ देणारे व्यक्तिमत्व” म्हणून प्रसिद्ध झालेले सामाजिक कार्यकर्ते विरेश गोरखनाथ शितोळे हे देखील प्रभागातील सर्व सोसायट्या आणि गणपती मंडळांना मागणीनुसार दुध पोच करणार असून, आतापर्यंत हजारो लिटर दुधाची मागणी त्यांच्याकडे नोंदली गेली आहे. त्याचबरोबर काकडे सिटी मध्ये आज रात्री महाभोंडला आणि रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. चेकमेट टाईम्सच्या दर्शकांना याबाबतचा सविस्तर व्हिडीओ उद्या चेकमेट टाईम्सच्या युट्युब, फेसबुक आणि डेली हंट’वर पाहायला मिळणार आहे.

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.