Headlines
Loading...
पालिकेच्या कागदावरील पारंपारिक मळकट नावाला लक्ष्मी दुधाने यांनी केले रिफ्रेश; आता याचेही कार्यालय

पालिकेच्या कागदावरील पारंपारिक मळकट नावाला लक्ष्मी दुधाने यांनी केले रिफ्रेश; आता याचेही कार्यालय

 

पुणे, दि. ३ (चेकमेट टाईम्स): खरं तर स्वच्छता मानवी अंगाचा मुलभूत घटक. स्वच्छता नसेल तर सर्वांचेच आरोग्य बिघडते, मग ती घराच्या आतली असो की बाहेरची. जशी घरातली स्वच्छता करायची कुटुंबियांची असते, तशीच परिसराची स्वच्छता राखणे देखील त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची जबाबदारी. मात्र तसे होताना दिसत नाही. यावर उपाय म्हणून महापालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी घेतली. या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दररोज स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासह, त्यांची हजेरी, कामाबाबत सूचना आणि एकूणच कामाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी म्हणून आरोग्य कोठ्या निर्माण केल्या. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगले काम करणाऱ्या या “आरोग्य कोठी” हे नावच ऐकलं, वाचलं तरी “कोठी” या शब्दामुळे त्याकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन तितकासा चांगला नाही, हे सांगायला कुठे ‘जाहीर वाच्यता’ होण्याची गरज नाही.

 

यावर उपाय म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्मार्ट पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या संकल्पनेतून, नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी या “आरोग्य कोठी”ला पर्याय तयार करून, कर्वेनगरच्या शाहू कॉलनी गल्ली क्रमांक २ च्या कोपऱ्यावर आणि शहरातील सर्वात मोठ्या ई लर्निंग स्कूलच्या रस्त्यावर एक सुंदर “आरोग्य सेवा कार्यालय” सुरु केलंय. ज्यामध्ये पारंपारिक “आरोय कोठी” प्रमाणे कुबट, मळकट वास नसेल, खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश असेल याची काळजी स्वप्नील आणि लक्ष्मी दुधाने यांनी घेतलेली पाहायला मिळते. अशा या आरोग्य सेवा कार्यालयाचे उद्घाटन प्रभागातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक विठ्ठलराव शेवाळे, खेळाडू व योग प्रशिक्षक जितेंद्र शहा व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. भालचंद्र कापरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या आरोग्य सेवा कार्यालयासह, नागरिकांची आधारकार्ड काढणे, त्याची दुरुस्ती करणे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी आधार कार्ड केंद्र आणि शाहू कॉलनी मधील नागरिकांच्या मागणीवरून बांधण्यात आलेल्या सुसज्ज ज्येष्ठ नागरिक कट्टा, कै. वसंत सदाशिव बगाडे वाचनालय यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

 

या “आरोग्य सेवा कार्यालयात” काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षक, मुकादमच नव्हे तर अगदी झाडूवाल्याला देखील आपण “स्मार्ट पुण्याच्या - स्मार्ट कार्यालयात” काम करत असल्याची अनुभूती येऊन, त्याला काम करत असलेला परिसर तेवढाच चकाचक ठेवण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या कार्यालय उभारणीमागचा हेतू असल्याचे स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.

 

याप्रसंगी आरोग्य सेवा कार्यालयाचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या प्रतिक फुंड, अनिल राठोड, आधार कार्ड केंद्राचे प्रमुख कुंबरे, ज्येष्ठ नागरिक कट्टा विकसित करणारे समीर साठे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर स्वच्छता दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सहभाग घेणाऱ्या पुणे मनपाचे सफाईसेवक प्रसाद गायकवाड, सागर राजगुरू, नामदेव जेटीथोर, नंदा गोरखे व सामाजिक कार्यकर्ते रवी बगाडे व जाधव सर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अमृत कलक्ष सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत खैरे, नंदिनी बगाडे, प्रमोद शिंदे, अंजिक्य दुधाने व प्रभागातील विविध सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन जयश्री धुपकर व आभार किशोर शेडगे यांनी मानले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक :

आमच्या युट्युब’ची लिंक :

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक :

आमच्या ट्विटर’ची लिंक :


0 Comments: