Headlines
Loading...
राहुल लोहकरे यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र "कला सन्मान" राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राहुल लोहकरे यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र "कला सन्मान" राज्यस्तरीय पुरस्कार जाहीरपुणे, दि. १३ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील राहुल लोहकरे यांच्या स्टेनग्लास आर्ट (देविदेवतांच्या काच प्रतिमा) क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना “आर्ट बिटस् महाराष्ट्र"चा चित्र या विभागात राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार जाहीर झाला असून, हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे.

 हे आहेत २०१९ निवडणूकीत सर्वाधिक मते मिळवलेले खासदार

या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की, आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.

 मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवावेत का; स्त्री रोग तज्ञ डॉ मेघा रॉय यांचा महत्वपूर्ण सल्ला

राहुल लोहकरे गेली १८ ते १९ वर्षे  स्टेन्ड ग्लास कलेच्या माध्यमातून देविदेवतांच्या काच प्रतिमा घडवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आत्ता पर्यंत १२१ काच प्रतिमा तयार करून दिल्या आहेत. ज्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांसह, नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 

प्रचंड पावसामुळे रस्त्यांचे झाले नाले, वाहून गेल्या मोटारी


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune

0 Comments: