Type Here to Get Search Results !

अखेर 1 कोटी 32 लाख रुपयांच्या पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात; गणपतीच्या मोरगावला मिळणार पाणी

 


Finally the pipeline work of Purandhar Upsa Irrigation Scheme of Rs. 1 crore 32 lakhs started; Ganpati's Morgaon will get water

 

पुणे, दि.३० एप्रिल २०२२ (चेकमेट टाईम्स): काहीजण अधिकारी पदावर गेले की आपला गाव, आपली माणसं विसरतात आणि नव्याने आलेल्या आर्थिक श्रीमंतीतून तयार झालेल्या विश्वात रमतात. मात्र काहीजण आपले मूळ न विसरता काम करताना दिसतात. असेच एक उदाहरण समोर आले असून, पुणे महानगरपालिकेमध्ये उपायुक्त (Pune Municipal Corporation Deputy Commissioner) असलेल्या एका अधिकाऱ्याने आपल्या कामाची व्याप्ती वाढवत असताना, जनमानसातील प्रत्येकाला सुविधा पोचवण्याचे व्रत हाती घेतले असल्याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. या अधिकाऱ्याने शहरातील आपले कर्तव्य पूर्ण करत असताना, आपल्या गावाप्रती देखील कर्तव्य बजावले आहे (While fulfilling our duty in the city, we have also fulfilled our duty towards our village).

 




पुणे (Pune District Agriculture) जिल्ह्यातील बारामती (Baramati Agriculture) तालुक्यात येत असलेल्या अष्टविनायक गणपतीपैकी (Ashtavinayak Ganapati) एक असलेल्या श्री क्षेत्र मोरगांव (Shri Kshetra Morgaon) येथील जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या माध्यमातुन आणि आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे (Adar Poonawala Serum Institute Pune) यांच्या सहकार्यातुन पुरंधर उपसा सिंचन योजनेमध्ये (Purandhar Upsa Irrigation Scheme) जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा होणेकामी पाइपलाइन करण्यासाठी C.S.R फंडातून (CSR Find for Agriculture) 1 कोटी 32 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

 

हा निधी मिळवण्यासाठी आणि सदर पाईपलाईनच्या कामासाठी या पालिकेच्या अधिकाऱ्यासह मोरगाव येथील तरुण शेतकरी कार्यकर्ते अनिल ढोले, चांगदेव ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले, विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, नारायण तावरे, विलास तावरे, महादेव ढोले, अभिजीत ढोले तसेच मोरगावचे विद्यमान सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच पोपट तावरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष कष्ट घेतले आहेत. सदर योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

 

सदर योजनेसाठी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप शंकरराव कदम (Sandeep Shankarrao Kadam, Deputy Commissioner, Pune Municipal Corporation) यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले आहे. कदम यांच्या या पाठपुराव्यामुळे सदर पाईपलाईनचे काम येत्या एक दोन दिवसांत चालू होणार असुन दिड ते दोन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर अंदाजे 150 ते 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे.

 

संदीप कदम हे मोरगांवचे भूमिपुत्र आहेत आणि ग्रामस्थांना त्यांचा अभिमान आहे अशा प्रकारची कौतुकाचा वर्षाव मोरगावचे सरपंच निलेश केदारी आणि ग्रामस्थांनी कदम यांच्यावर केला आहे. या योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार, सिंचन विभागातील मुख्य अभियंता आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानत सत्कार केला आहे. तर संदीप कदम यांच्याप्रमाणेच इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील आपापल्या गावाला अशाप्रकारे निधी उपलब्ध करून देताना, गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केल्यास, गावे सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.