Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीची जय्यत तयारी; कोपरा सभांना झाली सुरुवात

Aam Aadmi Party's triumphant preparations for Pune Municipal Corporation elections; The corner meetings started

 

पुणे, दि.१ मे २०२२ (चेकमेट टाईम्स): दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आता महाराष्ट्रात आम आदमी पार्टीने (aam aadmi party Maharashtra pune) लक्ष केंद्रित केल्याचे दिसत असून, त्याची सुरुवात लहान लहान निवडणुकांपासून करण्याच्या दृष्टीने ‘आप’ (aap) कडून कामकाज सुरु झाले आहे. पुणे शहरात नागरिकांकडून वसूल केला जाणारा कर (Pune Municipal Corporation Property Tax) आणि त्या मोबदल्यात मिळणार्‍या सुविधा यावर 'आप' तर्फे जनजागृती मोहीम (Awareness campaign by aap) राबविली जात आहे. यासाठी शहराच्या कानाकोपर्‍यात ठिकठिकाणी कोपरा सभा (corner awarness meeting) घेवून सामान्य जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. काल या मोहिमेची सुरुवात खडकमाळ, मामलेदार कचेरी येथून करण्यात आली.

 



अनेक भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. पाणीपट्टी (water tax pune) भरून ही नागरिकांना पैसे देवून पाणी विकत घ्यावे लागते. अनेक ठिकाणी कचरा व सांडपाण्याच्या (garbage & dranage management pune) नि:सारणाची योग्य व्यवस्था नाही. आम आदमी पक्ष हीच भूमिका घेवून सामान्य जनतेमध्ये जात आहे. प्रत्येक प्रभागांत किमान 5 ते 10 कोपरा सभा घेतल्या जाणार आहेत. स्थानिक समस्यां (local public problems) खेरीज प्रचंड इंधन दरवाढ, घरगुती  कुकिंग गॅसचा हजाराच्या घरात पोहोचलेला दर, महागडी वीज हे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील करून सोडणाऱ्या मुद्द्यांना या कोपरा सभाद्वारे ऐरणीवर घेतले जाणार आहे.

 

काल मामलेदार कचेरी, खडकमाळ आळी व मंडई भागात झालेल्या पहिल्या कोपरा सभेत 'आप' चे वाहतूक विंग राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य (shrikant acharya) यांनी महागाईच्या मुद्द्याला हात घालत येणार्‍या बिकट काळासाठी सजग राहुन सामान्य माणसांच्या जीवनाशी संबंधित बाबींबाबत अभ्यासपूर्ण उपाय योजना अंमलात आणण्याची क्षमता व  साफ नियत असणार्‍या आम आदमी पक्षासोबत उभे राहण्याचे आवाहन केले. तर या भागातील 'आप' चे युवा नेते पियुष हिंगणे (piyush hingane) यांनी या प्रभागातील स्थानिक समस्यांकडे लक्ष  वेधले. या प्रसंगी प्रभागातील नागरिक व 'आप' चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.