Type Here to Get Search Results !

राहुल कंस्ट्रक्शनच्या या प्रसिद्ध बांधकाम प्रकल्पावर पालिकेचा हातोडा

 

Municipal Corporation's hammer on this famous construction project of Rahul Construction


पुणे, दि.४ मे २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेचा कारभार प्रशासकाने (Pune Municipal Corporation Administrator) हातात घेतल्यापासून पालिकेने एकापेक्षा एक धडाकेबाज कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी (Mhatre Bridge to Rajaram Bridge DP Road) रस्त्यावरील अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई (Action on unauthorized hotels) करण्याचे धाडस दाखवण्यात आले. यानंतर पालिकेच्या कामगिरीचे काही भागात कौतुक, तर काही भागात पालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली. मात्र त्यानंतर थंड पडलेल्या पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने (PMC Unauthorized Construction Department) आज पुन्हा एकदा एक धडाकेबाज कामगिरी करत आपले अस्तित्व दाखवून दिले.


पालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन 3 चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे (Shrikant Waydande), उपअभियंता देवेंद्र पात्रे (Devendra Patre), यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सचिन जावळकर (Sachin Jawalkar), गंगाप्रसाद दंडीमे (Gangaprasad Dandime) यांनी पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या पोलीस बंदोबस्तात, पालिकेचे बिगारी, गॅस कटर, जेसीबी, ब्रेकर यांच्या सहाय्याने ही कारवाई केली. तर भविष्यात या कारवाई आणखीन तीव्र करण्याचा इशारा देखील पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

 

राहुल कंस्ट्रक्शनच्या (Rahul Constructions) वारजे माळवाडी मधील राहुल पार्क (Rahul Constructions, Rahul Park, Warje Malwadi, Pune) या सोसायटीचे मुख्य गेट क्रमांक १ या कारवाई मध्ये तोडण्यात आले. या गेट क्रमांक १ च्या आत मध्ये पुणे महानगरपालिकेचे सार्वजनिक उद्यान (PMC Public Garden) असून तेथे पुणे महानगरपालिकेसह आमदार निधीतून देखील खर्च करण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या अॅमिनिटी स्पेस (Amenity Space of PMC) मध्ये बांधण्यात आलेल्या या उद्यानाला जाणारा सार्वजनिक रस्ता (Public Road) राहुल पार्क (Rahul Park) या सोसायटीने गेट घालून अडवलेला होता. तर रखवालदारांच्या माध्यमातून या उद्यानात बाहेरील व्यक्तींना जाण्यास मज्जाव (Forbid outsiders) करण्यात येत होता.

 

पालिकेच्या मालकीच्या आणि सार्वजनिक असलेल्या या उद्यानात जाण्यास मज्जाव होत असल्याने, काही नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे याबाबत दाद मागितली होती. यानंतर पालिकेने संबंधित सोसायटीला नोटीस बजावून सदरील रस्ता आणि उद्यान सर्व नागरिकांना खुले करण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र सोसायटीने त्याकडे दुर्लक्ष्य केल्यानंतर आता हे उद्यान पालिकेने कारवाई करत सर्व नागरिकांसाठी खुले केले आहे. त्यामुळे आता शेजारच्या राहुल पार्क (Rahul Park), अतुल नगर (Atul Nagar), पॉप्युलर गिरीधर नगर (Popular Giridhar Nagar), पॉप्युलर कॉलनी (Popular Colony), शिवशक्ती चौक (Shivshakti Chowk), विठ्ठलनगर परिसर (Vitthal Nagar), गोकुळनगर (Gokul Nagar) आणि सहयोग नगर (Sahyog Nagar) पठारावरील नागरिकांना या उद्यानाचा लाभ घेता येणार आहे.

याबाबत येथील रहिवाश्यांशी चर्चा केली असता, त्यांनी सदरील उद्यान हे महानगरपालिकेचे नसून सोसायटीचे खाजगी असल्याचे सदनिका खरेदीपूर्वी बांधकाम व्यावसायिकाकडून सांगण्यात आले असल्याचे चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदरील उद्यान पालिकेच्या मालकीच्या अॅमिनिटी स्पेस मध्ये बांधण्यात आले असल्याचे सांगितले. तर बांधकाम व्यावसायिक अशा जागा पालिकेला अॅमिनिटी स्पेस म्हणून हस्तांतरित करत असतात. त्याचा त्यांना मोबदला मिळत असतो, अशीही माहिती समोर आली आहे. एकूणच नागरिकांना हे उद्यान खुले होत असले तरी, त्याचा कितपत नागरिक फायदा घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

17 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Stop lying. The garden was always open for the people outside. The issue was created by the neighboring societies as they were not interested in contributing to clubhouse fees and people also used their premises to enter an open area behind their society.

    उत्तर द्याहटवा
  2. Complete false news…. It was very clear from day one that the amenity space was for common use. In fact it was illegally used for paid coaching classes against PMC rule. No one was ever stopped from going to the amenity space & this action from PMC is unfair to the residents of Rahul Park & the safety, security of residents is at stake now.

    उत्तर द्याहटवा
  3. It Is absolutely wrong news. Members from Rahul Park A phase society is not restricting anyone to go in the PMC ground.Infact people are playing there from morning 6am.Also some boys are playing football till night 10pm.From some years There was kids fitness club too.It is really aggressive action by PMC against common public.There should be keep board mention specific opening hours like other PMC park.

    उत्तर द्याहटवा
  4. incorrect news and a complete lie
    All neighbouring children and others played since beginning as well. Kids Fitness Training was conducted with over 50 children since last few years with fees paid by each one
    Pls correct your understanding and news a week apologise for this incorrect news
    The gate was safety to the people going to the ground and children and residents as well avoid all miscreatures

    This was an unwarranted action to satisfy ego of some neighbouring societies

    उत्तर द्याहटवा
  5. मागील कमीत कमी 5 वर्षे ह्या मैदानावर व्यायाम चे कलाससेस घेण्यात येत होते, रोज रात्री 10 पर्यंत आजू बाजू च्या सोसायटी चे मुलं येऊन फुटबॉल खेळत होती आणि आता ही खेळत आहेत, रविवारी पण क्रिकेट चा खेल सुरू असतो.
    पत्रकार ने अभ्यास न केल्यामुळे, आणि नुसती एक बाजू मांडून सत्या चा शोध ना लावल्यामुळे जी विनाकारण रहिवाशांची बदनामी होणार आहे आणि वारजे परीसरात खोटी बातमी प्रसार होईल याची काळजी नाही घेतली त्या बद्दल स्वतःवर जबाबदारी घेतली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. खोटी बातमी....धडाकेबाज कामगिरी तर मुळीच नाही, मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी अधिकारांचा दुरूपयोग... आणि चाटू पत्रकारिता. मैदानावर रोज सोसायटी बाहेरील लहान मुलांचे खेळ चालतात....

    उत्तर द्याहटवा
  7. This news is a blatant lie. The garden is open for everyone and kids from other societies come and play football until as late as 10 PM, often even past that time. There are kids' activities going on in the evening from 5 PM onwards. If the reporter actually bothered to visit the garden they would get to see that. It is also a lie that the reporter interviewed some members of the society who said that this garden is their private amenity space. All residents of our society have always known that this is a PMC amenity space. It was made clear on day 1 when we came to see the flats. The reporter has made up a lot of lies against the society!

    उत्तर द्याहटवा
  8. बातमी चुकिची आहे. PMC उद्यानचा वापर सकाळी 6.0 वाजता पासुन रात्री 10.00 वाजेपर्यंत सोसाइटी बाहेरच्या लोकानी होत असतो. फुटबॉल, क्रिकेट आणी लहान मुलांचे फिटनेस्स वर्ग हे कित्येक वर्षापासून सुरु आहेत.
    हे गेट नेहमी उघडे रहात असत अणी त्यामूळे कोणालाही उद्यानात प्रवेश हा मोकळा आहे.

    शेजारच्या सोसायटींना ( काही लोक) हे कळावे की आज तुम्ही काही मदत घेउन तुमच्या स्वार्था करिता हे कार्य घडवून आणले आणी तुमच्या नेहमीच्या शेजरच्यांचि सेफ़्टी अणी सिक्योरिटी काढून टाकली. छान आहे, तुम्हाला आनंद मिळाला. पण हे लक्ष्यात घेणे आवश्यक आहे की, ह्यामुळे सर्वच सोसाइटीची सिक्योरिटी कमी झाली आहे.


    उत्तर द्याहटवा
  9. एकदम खोटी बातमी आहे. आज पर्यंत कुणालाही मैदानावर जाण्यासाठी अडविण्यात आले नाही. हे गेट फक्त सुरक्षे साठी चेक पॉईंट होते. यामुळे कुणालाही त्रास होत नव्हता. बातमी मध्ये जी बिल्डर आणि सोसायटी मधील राहिवाश्यां बद्दल माहिती दिली आहे ती तर कुणाशीही न बोलता मनाला वाटेल ते लिहिले आहे. खरी माहिती पाहिजे असेल तर पत्रकाराने सोसायटीच्या कमिटीच्या अधिकाऱयांना भेटायला हवे होते. ही चुकीची पत्रकारिता आहे . निषेध....

    उत्तर द्याहटवा
  10. This is absolutely lie. This is paid reporting by Corporator, he is conducting illegal sports classes by collecting money on PMC ground

    उत्तर द्याहटवा
  11. Completely false narrative, it’s a propaganda portal circulating lies. Why the same action hasn’t been taken on Atul Nagar’s gate?? Paid news, action taken under pressure by corporator to protect his financial interests. Shameful act!

    उत्तर द्याहटवा
  12. हि बातमी खोटी आहे, गेली अनेक वर्ष राहुल पार्क गेट 1 मधल्या मैदानावर क्रिकेट,फुटबॉल आणि व्यायाम वर्ग चालवले जात आहेत, फ्लॅट घेतला तेंव्हाच बिल्डर ने सांगितले होते मैदानाची जागा कॉर्पोरेशनच्या मालकीची आहे, त्यामुळे सोसायटी मधील लोकांनी कोणाला अडवले नाही. पत्रकारांनी स्वतः येऊन माहिती घेणे आवश्यक आहे, खरं काय ते जाणून घेऊन बातमी छापावी.कोणाच्या नुसत्या सांगण्यावरून बातमी छापू नये.

    उत्तर द्याहटवा
  13. खोटी आणि चुकीची बातमी आहे... सोसायटी मधील सर्वांना कल्पना आहे की ही ॲमिनिटी स्पेस पीएमसी ची आहे. तिथे जाण्यासाठी कोणालाही आडवले जात नव्हते..अनेक जणांनी खेळण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे...

    उत्तर द्याहटवा
  14. False news!!! The builder had clarified to the residents during building construction itself that the amenity space belonged to PMC. And so, the space was kept accessible to all by the society residents. Children from outside used to play football till 10.30 PM, which is much beyond the permissible timing in any PMC managed amaenity space, still the residents cooperated. The main gate AND the barrier, which was demolished was always kept open throughout the day and nobody was forbidden.

    उत्तर द्याहटवा
  15. धादांत खोटी बातमी. राहुल पार्क सोसायटीच्या आवारात नियमाप्रमाणे काही जागा अमेनिटी मैदानाला बिल्डरनेच सोसायटी बांधतेवेळेस सोडलेली आहे.
    राहुल पार्क ला असलेले गेट हे १३ वर्षांपासून असून गेट दिवसभर उघडे असते, आणि अमेनिटी गाऊंड कडे जाणाऱ्या कुठल्याच नागरिकास राहुल पार्क सोसायटीने कधीच मज्जाव केलेला नाही, उलटपक्षी राहुल पार्क सोसायटीला हे माहित आहे कि गेट मधून प्रवेश केल्यानंतर आत येऊन उजवीकडे वळून अमेनिटी ग्राउंड कडे जाणारा रस्ता सर्वांसाठी आहे.
    अशा प्रकारचे गेट्स वारजेच काय संपूर्ण पुण्यात बरेच ठिकाणी पाहायला मिळतील.

    ही कारवाई PMC ने अन्यायकारक पद्धतीने केलेली आहे, तसेच हे हि समजते कि अशात तिथे PMC ने राहुल पार्क A विंग च्या पश्चिमेकडून कलम २०५ अंतर्गत रस्ता तयार करण्याचा घाट घातला असून सदर २०५ चा रस्ता राहुल पार्क A विंग च्या हद्दीतून बेकायदा घुसवला आहे, त्यासाठी राहुल पार्क A विंगने माननिय PMC न्यायालयात दाद मागितली आहे, त्यावर योग्य उत्तर देण्याचे सोडून PMC अशाप्रकारच्या कारवाया करीत आहे.

    आता गेट पाडल्यामुळे राहुल पार्क A विंग च्या पश्चिमेकडून तसेच मुख्य रस्त्याकडून आत मध्ये वाहने वेगाने जा ये करू लागली आहेत. ह्यातून एखादा मोठा अपघात घडल्यास PMC ह्याची जवाबदारी घेईल का?????????

    उत्तर द्याहटवा
  16. Completely miss guided news. The PMC open ground is illegally used for paid coaching classes against the PMC rules needs to be restricted by PMC. A1-A2-A3 society members are always co operating & allowing all for entry on ground. For the safety of kids & public approaching ground PMC should action plan controls being limited space available.

    उत्तर द्याहटवा