Headlines
Loading...
कॉंक्रीट मिक्सर ट्रकने धडक दिल्याने वारजे मधील महिलेचा मृत्यू; कोथरूड मधील महिला जखमी

कॉंक्रीट मिक्सर ट्रकने धडक दिल्याने वारजे मधील महिलेचा मृत्यू; कोथरूड मधील महिला जखमी

 


पुणे, दि.२० जून २०२२ (चेकमेट टाईम्स): कॉंक्रीट मिक्सर ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवरून चाललेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, तिच्याबरोबर असलेल्या महिला जखमी झालेल्या आहेत. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये कॉंक्रीट मिक्सर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पांढरे पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रंजना दाभेकर (वय.६० रा.शिवकल्याण नगर, कोथरूड, पुणे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून, मुग्धा दाभेकर (वय.३० रा.शिवकल्याण नगर, कोथरूड, पुणे) जखमी झाल्या आहेत. मयत रंजना दाभेकर आणि मुग्धा दाभेकर या रविवार दि.१९ जून २०२२ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोपेड दुचाकी वरून जात असताना, मागून भरधाव वेगात आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष्य करत आणून, दुचाकीवरून चाललेल्या दोघींना जोरात धडक दिली.

यामध्ये जखमी झालेल्या रंजना दाभेकर यांचा मृत्यू झाला. तर मुग्धा दाभेकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत सुहास दाभेकर (वय.५३ श्रीराम सोसायटी, वारजे, पुणे) यांनी तक्रार दिली असून, कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये कॉंक्रीट मिक्सर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाला अद्याप अटक करण्यात आलेले नसून, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पांढरे पुढील तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

0 Comments: