Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्याला १५ वर्षांची सक्तमजुरी; उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडला होता प्रकार

 


पुणे दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन, तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने नुकतीच सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून, एकूण १५ वर्षांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. २०१६ मध्ये उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत सदरील घटना घडली होती.

कार्तिक काशीनाथ कारागीर असे त्या शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, मे सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी निकाल दिला आहे. ही घटना सन २०१६ साली उत्तमनगर भागात घडली होती. अल्पवयीन मुलीच्या आईने २० नोव्हेंबर २०१६ रोजी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर, तत्कालीन महिला पोलीस उप-निरीक्षक निकम यांनी या गुन्हयाचा तपास केला होता. त्यानंतर आरोपी कार्तिक कारागीर यास तात्काळ अटक करून अल्पयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले होते. या गुन्ह्यात आरोपीस शिक्षा लागण्यास पीडीत मुलगी आणि आरोपीच्या केलेल्या वैदयकीय तपासणी अहवाल महत्वाचा दुवा ठरला.

या केस मध्ये मा. न्यायालयाने वेगवेगळ्या कलमाप्रमाणे, अल्पवयीन मुलीस पळवुन घेवुन जाणे या गुन्ह्यात आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रूपये दंड आणि अल्पवयीन मुलांवर लैगिक अत्याचार कायदा (पोक्सो) अॅक्ट मध्ये १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रूपये दंड अशी एकुण १५ वर्षे कारावास व दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगावयाच्या आहेत.

या गुन्हयात तपासी अंमलदार म्हणुन महिला पोलीस उप-निरीक्षक निकम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी गणेश माने, पोलीस हवालदार राजपुत, डिगोळे, निकम व महिला पोलीस अंमलदार रासकर यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकील म्हणुन मेडंकी तर आरोपीचे वकील म्हणुन गंडाळ यांनी कामकाज पाहिले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.