Type Here to Get Search Results !

पोलिस हवालदाराच्या मदतीमुळे नदीत अडकलेल्या मुस्लिम तरुणाला जीवदान

 


पुणेदि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): मीना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तरुणाला पोलिस हवालदार सावजी सातपुते, पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांच्या मदतीमुळे जीवदान मिळाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

वारुळवाडी येथील सलीम शेख हा तरुण रविवारी सायंकाळी मीना नदी पत्रात मासेमारी करत होता. दरम्यान सायंकाळी मीना नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली.सलीम शेख उभ्या असलेल्या नदी पत्रातील खडकाच्या बाजूने पाणी पातळी वाढू लागली.

या बाबतची माहिती हवालदार सावजी सातपुते, पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना समजली.पोलीस पाटील भुजबळ यांनी पोलीस मित्र सुनील जाधव, ग्रामसुरक्षा दलातील आदित्य डेरे, गोकुळ कोळी यांच्या मदतीने शेख याला पाण्यातून बाहेर काढले. वडज धरण परिसरात पाऊस सुरू असल्याने मीना नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होत आहे.या मुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.