Headlines
Loading...
कर्वे रस्त्यावरून तरूणीला चाकणला पळवून नेऊन केला बलात्कार; वारजे माळवाडी मधील तरुणावर गुन्हा दाखल

कर्वे रस्त्यावरून तरूणीला चाकणला पळवून नेऊन केला बलात्कार; वारजे माळवाडी मधील तरुणावर गुन्हा दाखल

 


पुणेदि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): किरकोळ कारणावरून वाद झाला असताना कॉलेजवर येऊन दुचाकीवरून जबरदस्तीने तरुणीला चाकणला घेऊन जात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी शेरखान शब्बीर सय्यद (वय २५, रा. वारजे माळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित तरुणीने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

हा प्रकार कर्वे रोडवरील महाविद्यालयापासून चाकण एमआयडीसी येथील वीटभट्टी जवळील एका खोलीत बुधवारी दुपारी २ ते गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडला.

अधिक माहितीनुसार,फिर्यादी व आरोपी यांच्यात एक महिन्यांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. फिर्यादी दि. २० जुलै रोजी कॉलेजला गेल्या असताना तो तेथे आला. तुझ्याशी ५ मिनिटे बोलायचे आहे असे सांगून फिर्यादीला बाहेर घेऊन येत दुचाकीवरून चाकणला नेले. आरडा ओरडा केला तर जीवे मारून टाकील, अशी धमकी देऊन फिर्यादीवर बलात्कार केला. पुन्हा दुचाकीवरून कॉलेजजवळ आणून सोडले. पोलीस उपनिरीक्षक कवटीकर तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

0 Comments: