Type Here to Get Search Results !

वारजे मधील एक जण एक वर्षासाठी स्थानबद्ध

 


दि. 02 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगार व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुर याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत तब्बल 71 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुर (वय-31 रा. सहयोगनगर, वारजे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. विकी अनपुर याला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. विकी अनपुर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिस्टल, कोयता, तलवार, चाकू, लाकडी दांडका यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी विकी अनपुर याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.  वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.