Type Here to Get Search Results !

खडकवासला-नांदेड सिटीला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल गेला वाहून; वाहतूक बंद

 


पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): खडकवासला गावातून नांदेड सिटी व नांदेड गावात जाणाऱ्या पर्यायी रस्त्यावरील खडकवासला गावच्या स्मशानभूमीजवळ असलेला पूल मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये वाहून गेला आहे. सध्या पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी स्थानिक रहिवासी, दुग्ध व्यावसायिक व या रस्त्यावरुन ये-जा करणारे नोकरदार यांची गैरसोय होत असल्याने पालिकेने पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. काल दि. 27 जुलै रोजी खडकवासला व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने खडकवासला गावातील ओढ्याला पूर आला होता. या पूरामध्ये खडकवासला गावच्या स्मशानभूमीजवळ असलेला पूल वाहून गेला आहे.

पूलाचा अर्धा भाग वाहून गेला असून सध्या अर्धा पूल धोकादायक स्थितीत आहे. सद्यस्थितीत चारचाकी वाहतूक बंद करण्यात आली असली तरी काही नागरिक जीव धोक्यात घालून दुचाकी घेऊन जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे हा पुला वाहून गेला होता तेव्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करण्यात आले होते आता पालिकेने तातडीने काम करुन घ्यावे अशी मागणी माजी सरपंच सौरभ मते यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. "मोठी लोकस्ती या रस्त्यावर अवलंबून आहे. तसेच अत्यंत जवळ पडत असल्याने नांदेड सिटीत जाण्यासाठी अनेक नागरिक पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर करतात. पूल धोकादायक स्थितीत असल्याने रात्रीच्या वेळी अपघात होऊ शकतो. तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.” यतीन रायकर, नागरिक खडकवासला.

"माहिती मिळाल्यानंतर लगेच जाऊन पाहणी केली असून नागरीकांची सुरक्षा लक्षात घेऊन पालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाशी सदर काम करुन घेण्याबाबत पत्रव्यवहार करण्याचे काम सुरू आहे." निरंजन रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

"पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूलाची पाहणी केली आहे. मलनिस्सारण, मुख्य खात्याला याबाबत कळविले असून कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केला आहे." - प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय , पुणे मनपा.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.