Headlines
Loading...
सेरेब्रम आय टी पार्कमधील एलरो पबमध्ये जेवायला आलेल्या वकिलाला मालकांची मारहाण

सेरेब्रम आय टी पार्कमधील एलरो पबमध्ये जेवायला आलेल्या वकिलाला मालकांची मारहाण

 


पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): कल्याणीनगर येथील एका पबमध्ये जेवणासाठी गेले असताना त्यांनी जेवणाची चौकशी केल्यावर पबच्या मालकाने पिस्तुल रोखून वकिलाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अ‍ॅड. मनोज सतीश माने (वय ३२, रा. हेवन पार्क, कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३६०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एलरो पबचे मालक सुमीत चौधरी (वय ३४), संकेत सावंत (वय ३५), प्रफुल्ल गोरे (वय २९), गुंड व बाऊन्सर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कल्याणीनगर येथील सेरेब्रम आय टी पार्कमधील आठव्या मजल्यावरील एलरो पब बी ३ येथे १४ जुलै रोजी पहाटे पावणेतीन वाजता घडला होता.  

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र पहाटे जेवण्यासाठी एलरो पब येथे गेले होते. त्यांनी गेटवर जेवणाबद्दल विचारले. तेव्हा सिक्युरिटी यांनी जेवण मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी तेथे असलेल्या आरोपींना त्याबाबत विचारले असताना त्यांनी संगनमत करुन फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रांना मारहाण केली. तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावतो, असे म्हटले. त्यावर आरोपींनी फिर्यादीवर पिस्तुल रोखून पोलिसांना बोलवतो काय असे म्हणून मारहाण केली. पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

0 Comments: