Type Here to Get Search Results !

राहुल दांगट यांच्या खुनप्रकरणी स्नूकर चालकाला अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश

पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक वादातून मित्रानेच मित्राचा डोक्यात लोखंडी रॉड मारुन, नायलॉनच्या दोरीने गळा आवळुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर भरती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल बबन दांगट, (वय 46 वर्षे, आंबेगाव बु., पुणे) असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मित्राचे नाव असून, संशयित आरोपी नामे सुशांत नारायण आरुडे, (वय-30 वर्षे, रा. चिंतामणी अपार्टमेंट, फालेनगर, आंबेगाव बु. पुणे) याने राहुल दांगट यांचा लोखंडी रॉड डोक्यात मारून व नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला. सदरील घटना आज शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटांनी, सुशांत आरुडे यांच्या “पुर्वी पॉकेट कॉर्नर” या भारती विद्यापीठच्या पाठीमागे, आंबेगाव बुद्रुक मध्ये असलेल्या स्नूकर सेंटर मध्ये घडली. याबाबत विकास बबन दांगट, (वय 42 वर्षे, आंबेगाव बु., पुणे) यांनी भरती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

खुनाची घटना घडल्याची माहिती मिळताच परिमंडळ 2च्या पोलीस उप-आयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहा पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान तपासाबाबत सूचना देत, संशयिताला घटना घडल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात यश आले असून, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com    

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.