Type Here to Get Search Results !

फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार; महिलेला भाड्याने हवे होते घर

 



पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वैद्यकीय उपचारासाठी गाझियाबाद येथून आलेल्या एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. घटना 5 जानेवारी 2023 रोजी घडली.

यासंदर्भात गाझियाबाद येथील एका 39 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आणि आरोपीला अटक झाली आहे.

संजय बाजीराव भोसले (वय 52, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. हडपसरमधील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबाद येथील एक महिला मणक्याच्या त्रासामुळे उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आली होती. उपचारासाठी काही दिवस लागणार असल्यामुळे महिलेला राहण्यासाठी भाड्याने खोली घ्यायची होती. या महिलेने संजय भोसले याच्याकडे खोलीबाबत विचारणा केली.

तेव्हा त्याने खोली दाखविण्याच्या बहाण्याने सोसायटीमध्ये नेले. तेथे त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.