Type Here to Get Search Results !

Atikraman Karvai | वारजे माळवाडी मधील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण महिन्यात होणार?; मोठ्या कारवाईचे संकेत

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, Chekmet Times, Checkmate News, Chekmet News, Pune News, Pune Latest News

Atikraman Karvai in warje malwadi pune


पुणे, दि. 24 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील मुख्य रस्ता असलेल्या स्व. सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे चौक (Late Golden MLA Rameshbhau Wanjale Chowk) ते गणपती माथा (Ganapati Matha, Warje Malwadi) भागातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले असून, त्यावर लवकरच ठोस उपाययोजना (Road Widing) होणार असल्याचे समोर येत आहे. आज वारजे माळवाडी मध्ये पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग (PMC Building Permit Department), वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा (Warje Karvenagar Ward Office) अतिक्रमण विभाग (Encroachment Department) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ही बाब प्रकर्षाने समोर आली.

Shitole Heights Warje malwadi

वारजे माळवाडी मधील डुक्कर खिंड (Dukkar Khind) ते हायवे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सर्व्हिस रस्त्यात (Warje Highway Service Road) येत असलेल्या अनधिकृत पत्राशेड, टपऱ्यांवर (Unauthorized sheds, shops) आज कारवाई करण्यात आली. या हायवेच्या शेजारील पुणे महानगरपालिकेचा सर्व्हिस रोडमध्ये साई सयाजी नगर (Sai Sayaji Nagar) पासून ते हायवे चौकापर्यंत बहुतांशी अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. मात्र बोटावर मोजण्याएवढी अतिक्रमणे वारंवार कारवाई करून देखील, रस्ता अडवून असल्याने, दररोज या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. तर तीच परिस्थिती वारजे हायवे चौक ते गणपती माथा रस्त्याची असून, सकाळी शहरात जाणाऱ्या रस्त्यावर आणि संध्याकाळी शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) नित्याची झाली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह पुणे महानगरपालिकेत आयुक्त विक्रम कुमार (PMC Commisioner Vikram Kumar) यांच्याबरोबर बैठक घेत, कोथरुड ते बहुली हा राज्य महामार्ग क्रमांक ११३ असून (Kothrud bahuli State Highway No. 113), तो कागदोपत्री १०० फूट रुंदीचा आहे. इंग्रज राजवट (British Govt Roads in Pune) असताना सन १९१८ साली या रस्त्याचे ८० फुट रुंद रस्त्याचे हस्तांतरण झाले. मात्र पुणे महानगरपालिकेने २३ वर्षापासून ताब्यात असलेल्या 80 फुटी रस्त्यावरची अतिक्रमणे (Encrochment) अद्याप काढली नसल्याने नित्याची वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तर या बैठकीनंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोडके यांच्यासह वारजे माळवाडी मधील मुख्य रस्ते आणि सर्व्हिस रस्त्याची पाहणी करत, तातडीने अतिक्रमणे काढण्याची तयारी केली होती.

त्यानंतर या एकाच आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या पथकांनी वारजे माळवाडी मध्ये कारवाईचे सत्र अवलंबले असून, आज शुक्रवार दि.24 मार्च 2023 ला वारजे हायवे सर्व्हिस रस्त्यावरील हुंदाई शोरूम (Hyundai Service Centre Warje) शेजारील गॅरेज, कावेरी हॉटेल (Kaveri Hotel) शेजारील खाऊ गल्ली, सिप्ला हॉस्पिटल (Cipla Hospital) चौकातील बेकायदेशीर टपऱ्या काढून रस्ता मोकळा करण्यात आला. तर वारजे माळवाडी मधील मुख्य रस्त्यावरील एकमेव सार्वजनिक मुतारी (Public Urinal) शेजारील अतिक्रमण वगळता बहुतांशी सर्वच अतिक्रमणे व्यापारी आणि जागा मालकांनी स्वयंस्फुर्तीने काढलेली होती.

 


मात्र या कारवाई मध्ये काही पत्राशेड आणि पक्क्या बांधकामांना अधिकाऱ्यांकडून एक आठवड्यापासून, एक महिन्यापर्यंत काढून घेण्याची मुदत दिली गेल्याचे पाहायला मिळाले. तर आता पुणे महानगरपालिकेने या रस्त्याच्या रुंदीकरणाची तयारी पूर्ण केली असून, लगोलग पथविभागाचे काम सुरु केले जाणार असल्याचे यावेळी उपस्थित मुख्य खात्याच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून समोर आले आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये वारजे माळवाडी मधील मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना होणार असल्याचे दिसते आहे.

 


आजची कारवाई बांधकाम विकास विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त राजेश गुर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली, बांधकाम विभागाचे उपअभियंता निवृत्ती उथळे, कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, रुपेश वाघ, पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश झोमण, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाचे परवाना निरीक्षक श्रीकृष्ण सोनार, मेघा राऊत, शुभांगी मेश्राम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा - Warje Crime: वारजे मध्ये अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला भाजी विक्रेत्यांची मारहाण; चार जण गजाआड



वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes            

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes            

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.