Type Here to Get Search Results !

बंदूक दाखवताना गोळी सुटून मित्र जखमी; उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Friend injured by bullet while pointing gun; Incident in Uttamnagar police station limits


 

पुणे, दि. 9 सप्टेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): बेकायदेशीरपणे मिळवलेले गावठी पिस्तुल मित्राला दाखवताना त्याचा चाप ओढला गेल्याने चुकून सुटलेली गोळी मित्राच्या मानेत घुसून मित्र जखमी होण्याची घटना उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सांगरुण गावात घडली. यावेळी त्याने मैत्रीची जाण राखत, तत्काळ आपल्या मित्राला रुग्णालयात दाखल करत, त्याच्यावर उपचार सुरु केल्याने, सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. याबाबत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगलेप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

 

 

याबाबत उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय छबन वायकर (वय 22, रा. सांगरुण, ता. हवेली, जि. पुणे) Abhay Chaban Waikar हा जखमी झाला असून, त्याच्यावर कोथरूड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगलेप्रकरणी पोलीस हवालदार आनंद रोहिदास घोलप यांच्या फिर्यादीवरून, परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar),  गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख (PI Shabnam Shaikh) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, सहायक पोलीस फौजदार जोशी, अनिरुद्ध गायकवाड, ज्ञानेश्वर तोडकर, दत्तात्रय मालुसरे, संभाजीराजे कोंढावळे यांच्या पथकाने अविष्कार ऊर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय 19, रा. सांगरुण, ता. हवेली, जि. पुणे) (Avishkar Tukaram Dhanawade) यांला रुग्णालयातून अटक केली आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अभय वायकर आणि अविष्कार धनवडे हे दोघेही मित्र असून, सांगरुण गावातील गणपती मंदिरात बुधवार दि. 6 सप्टेंबर 2023 रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भेटले होते. यावेळी अभय वायकर याने त्याच्यासोबत आणलेले गावठी पिस्तुल अविष्कार याला दाखवले. यावेळी ते पिस्तुल हाताळत असताना, अगोदरच लोड असलेल्या पिस्तुलाचा अनुभव नसलेल्या अविष्कार कडून पिस्तुलाचा चाप ओढला गेला. यामध्ये अविष्कार याच्या गळ्यात गोळी घुसून तो जखमी झाला. यावेळी अभय याने क्षणाचाही विलंब न लावता, अविष्कारला कोथरूड मधील खाजगी रुग्णालयात दाखल करत, त्याच्यावर उपचार सुरु केले. त्याच्यावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने, तो बचावला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार तपास पुढील तपास करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.