Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.२८ सप्टेंबर २०२४ (Checkmate Times): केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या
विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राज्यातील सर्व पक्षाच्या प्रतिनिधींशी बैठका घेऊन
आढावा घेतला असून, आज शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ पत्रकार परिषद घेऊन
याबाबत माहिती दिली. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी
पत्रकार परिषद बोलावल्याने आजच निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशा शक्यता
सकाळपासून वाटत होत्या. मात्र राजीव कुमार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक
तारखा गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. तसेच निवडणुका एक की दोन टप्प्यात होणार याची
लवकरच माहिती देवू,
असे सांगितले आहे. यावेळी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक
आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्यासह राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.
चोक्कलिंगम उपस्थित होते.
यावेळी राजीव कुमार
यांनी, मतदानाच्या दिवशी सर्व आस्थापनांनी पगारी सुट्टी देण्याची सुचना केल्याचे
सांगितले आहे. तर “जे अधिकारी तीन वर्षांपासून निवडणुक प्रक्रित आहेत, त्यांच्या
बदल्या केल्या जातील” असेही राजीव कुमार यांनी सांगितले आहे. तर यावेळी
निवडणुकांच्या तारखा आणि निवडणुका एक की दोन टप्प्यात होणार माहिती त्यांनी स्पष्ट
केलेली नाही. त्या लवकरच तारखा जाहीर केल्या जातील असे म्हटले आहे. त्यामुळे
राज्यातील निवडणुकीच्या तारखांवरून असणारी उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. राज्यातील
जनता “माझा हक्क, माझे मत” याप्रमाणे मतदान करतील. या विधानसभेचा २६ नोव्हेंबर
२०२४ रोजी कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे याआधी निवडणूक घ्यावी लागणार आहे.
हे तुम्हाला माहित
असायलाच हवे
राज्य निवडणूक
आयोगाकडून तयारी झाली असून विधानसभेचे एकूण २८८ मतदारसंघ आहेत. यात एससी (SC) चे
२९ आणि एसटी (ST) चे २५ मतदारसंघ आहेत. तर नोंदणीकृत मतदारांची संख्या ९.५९ कोटी
आहे. यापैकी पुरूष मतदार ४.५९ कोटी आणि महिला मतदारांची संख्या ४.६४ कोटी आहे. तर
तृतीयपंथीय मतदारांची संख्या देखील ६ हजार आहे. ८५ वर्षांच्या पुढचे मतदार १२.४८
लाख असून पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार १९.४८ लाख आहेत. राज्यात १ लाख १८६ मतदान
केंद्र असून ९ लाख नवीन महिला मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव
कुमार यांनी दिली. तसेच मतदान १०० टक्के होण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरी
विभागात बुथवर १०० टक्के आणि ग्रामीण भागात ५० टक्के सीसीटीव्ही लावण्यात येतील, अशी
माहिती दिली.
राजीव कुमार यांनी
राज्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आणि शासकीय कर्मचाऱ्यांशी
संवाद साधण्यात आला. यामध्ये ११ राजकीय पक्षांशी संवाद साधण्यात आला. यावेळी
राजकीय पक्षांनी दिपावली आणि छट पुजेचा विचार करून निवडणुकांची तारीख जाहीर करावी.
शनिवार आणि रविवार सोडून मतदान घ्यावे, मतदान केंद्रावर मतदानावेळी
योग्य तयारी करण्यात यावी. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्याबाबत सर्वत्र एकच
नियम लागू असावा आणि योग्य निर्णय व्हावा. त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांच्या
बदल्यांवर विचार व्हावा. तर पोलिंग एजंट त्याच मतदान केंद्राचा असावा, खर्चाचा विचार करून वाढवावा. फेक न्यूज वर देखील काम करावे, अशा मागण्या करण्यात आल्याचेही राजीव कुमार म्हणाले. यामध्ये राजीव कुमार
यांनी सण उत्सवाचा विचारकरून निवडणूकबाबत विचार केला जाईल, अशी
माहिती दिली. तसेच राजीव कुमार यांनी, ज्या नेत्यांवर गुन्हे
दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार
असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे राजकिय पक्षांना नियम पाळत गुन्हे दाखल असलेल्या
नेत्याला उमेदवारी का दिली याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
प्रत्येक केंद्रावर
व्हिलचेअर,
रॅम दिव्यांगासाठी करण्यात येतील. पाणी, लाईटची
व्यवस्था करण्यात येईल. तर जेथे लांब लाईन लागणारी ठिकाणे आहेत तेथे मतदारांना
बसण्याची व्यवस्था केली जाईल. तर यावेळी देखील वयोवृद्धांचे घरात जाऊन फार्म ‘डी’
च्या माध्यमातून मतदान घेतले जाईल. त्याचबरोबर अशा मतदारांना ‘सक्षम अॅप’च्या
माध्यमातून नोंद करावी लागणार आहे. पण अनेक वृद्धांची अशी इच्छा असते की ते
घराबाहेर पडून मतदान करण्यास येतात. त्याप्रमाणे तरूणांनी देखील घराबाहेर पडावे,
असे आवाहन कुमार यांनी केले. वेळ पडल्यास मतदारापर्यंत पोचण्यास
हेलिकॉप्टरचीही मदत घेणार असल्याचे कुमार यांनी सांगितले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share