Type Here to Get Search Results !

आमदारांनीच पदाधिकारी नेमले; त्यांच्याकडून कशी होणार पारदर्शक उमेदवारीची कलचाचणी?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today


 

MLAs appointed office bearers; How will they conduct a transparent candidature test?

 

पुणे, दि. ऑक्टोबर २०२४ (Checkmate Times): भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयामध्ये प्रत्येक विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांना बोलवून, अथवा मतदार संघात आयोजित पक्षाच्या बैठकांमध्ये अचानकपणे कोणत्या इच्छुकाला विधानसभेची उमेदवारी द्यावी यावर एक कल चाचणी घेण्यात येणार आहे. ती बंद पाकिटात असू शकते अथवा हात वर करू असू शकते. मात्र ही कलचाचणी ज्या पदाधिकाऱ्यांच्या मतावर केली जाणार आहे, ते पदाधिकारी तर आमदारांनीच नियुक्त केलेले असतात किंवा त्यांच्या मर्जीतले असतात. त्यामुळे हि कलचाचणी कितपत पारदर्शक होईल याबाबत भाजपाच्याच काही जुन्या आणि कट्टर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. तर अशी कलचाचणी घ्यायची असेल तर ती त्या त्या विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्व घेतलेल्या व्यक्तीपासून सर्वांची घेतली, तर पक्षाला किमान थोडा तरी अंदाज लागेल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय.

 

 

त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांच्या वेळी देखील अशी कलचाचणी घेण्यात आलेली होती. मग त्याचे पुढे काय झाले असा सवालही उपस्थित केलाय. त्या कलचाचणी मध्ये ज्यांच्याकडे कल दिसतोय, त्यांनाच उमेदवारी दिली गेली का? असा सवाल उपस्थित करताना, “ज्याची निवडून येण्याची क्षमता अथवा शक्यता आहे” त्यालाच उमेदवारी दिली जाते. पक्ष निरनिराळे सर्व्हे देखील करत असतो. त्यातलाच एक भाग म्हणून ठीक आहे. मात्र त्यातही आणखीन सूक्ष्म कल जाणून घेण्यासाठी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतलेल्या व्यक्तीला देखील यात सहभागी करून घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी हवे तर पक्षाकडे ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे अशा इच्छुकांची नावे पक्षानेच द्यावीत आणि यातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मते सदस्यांकडून ऑनलाईन मागवली तर ते पक्षाच्या हिताचे ठरू शकेल अशा प्रकारची इच्छा भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात.

 

 

यावर आपण पक्षालाच याबाबत थेट का सांगत नाहीत? असा सवाल केला असता, जुने दिवस वेगळे होते. आता कारभारी बदलले आहेत. ते आपली मते विचारत नाहीत आणि विचारात देखील घेत नाहीत. त्याचा परिणाम पक्षाची पीछेहाट होण्यात झाला आहे. खालपासून वर पर्यंत पत्रव्यवहार देखील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यात सत्यपरिस्थिती मांडली देखील गेली आहे. मात्र त्यावर अपेक्षित कार्यवाही होताना दिसत नाही. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही हे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे पक्षाने वेळीच आपल्या कार्यपद्धतीत आवश्यक ते बदल न केल्यास, त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना भोगावे लागू शकतील अशी भीतीही हे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.