Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news,
election campaign, election news, political news, business news, Marathi news
today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha,
parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha,
kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. १ ऑगस्ट २०२५ (Checkmate Times): दोन दिवसांपूर्वी शिवणे मधील दांगट पाटील नगर मध्ये पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांसाठी बचाव पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. हि घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा एकदा बचाव पथकाला शिवणे मध्ये धाव घ्यावी लागली. एका ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने पोहायला नदीपात्रात दुपारच्या सुमारास उडी मारली होती. मात्र बचाव पथक आणि पोलिसांना हि बाब समजेपर्यंत रात्र झाली हती. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाल्याने रात्री बचाव आणि शोधकार्य थांबवण्यात आले होते.
शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५ दुपारच्या सुमारास माऊली रामा चव्हाण (वय ११, रा. कामठे वस्ती, पंढरीनाथ कॉम्प्लेक्स, शिवणे, पुणे) हा मुलगा मित्रासोबत मुठा नदीत पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्रावर कपडे काढून त्याने नदीत उडी मारली. त्याचा मित्र कडेला उभा होता. मात्र उडी मारल्यानंतर मित्राला माऊली पुन्हा दिसलाच नाही. यावेळी कडेला उभ्या असलेल्या त्या मित्राने माऊलीचा नदी परिसरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर तासाभराने मित्र माऊलीच्या घरी गेला. घरी त्याचे कुटुंबीय नव्हते. त्यामुळे तो माऊलीसि कपडे घेऊन स्वत:च्या घरी गेला आणि संध्याकाळी माऊलीची आई घरी आल्यानंतर त्याने झालेली हकीकत सांगितली. यावेळी माऊलीच्या आईने तात्काळ उत्तमनगर पोलिसांना ही माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तमनगर पोलिसांनी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करत, रात्री उशिरा शोधमोहीम सुरू केली. मात्र रात्रीच्या अंधारात शोधमोहिमेत अडथळे येत होते. त्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. दरम्यान माऊलीने जेव्हा मुठा नदीपात्रात पोहायला उडी मारली तेव्हा खडकवासला धरणातून ७ हजार ३७० क्युसेक्स वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात आलेले होते. तर यात सायंकाळी ७ वाजता घट करून ते ३ हजार ७४० पर्यंत कमी केले होते. मात्र तरीही माऊलीचा शोध लागला नाही. उद्या शनिवार दि.२ ऑगस्ट २०२५ सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे हवेली आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. दरम्यान खडकवासला धरणातून सोडलेले पाणी आणखीन कमी करावे लागेल का याचीही चाचपणी प्रत्यक्ष घटनास्थळी पोचल्यानंतर करण्यात येणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share
