Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. १८
ऑगस्ट २०२५ (Checkmate Times): गेल्या अनेक दिवसांपासून पुणे महापालिका
प्रशासनातर्फे गोपनीयता राखून प्रारूप प्रभागरचना करण्यात आल्यानंतर तो निवडणूक
आयोगाला सादर करण्यात आला होता. आता पुढच्या चार दिवसांमध्ये प्रारूप प्रभागरचना
जाहीर होईल. त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील आणि हरकती-सूचनांवर प्राधिकृत
अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेतील जाईल. त्यानंतर आवश्यक ते बदल करून अंतिम केलेली
प्रभागरचना म्यान नगरविकास विभागाला सादर केली जाईल. सरकारकडून ती निवडणूक आयोगाला
सादर केली जाईल. त्यानंतर पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना कधीही जाहीर होऊ
शकते.
ही प्रारूप
प्रभागरचना राज्य सरकारकडे सादर करण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना राजकीय
आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली हती. महाविकास आघाडीने प्रभागरचनेत सत्ताधारी
महायुती हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. तसेच नियमांचे उल्लंघन करून नैसर्गिक
हद्दी ओलांडून प्रभागांच्या सीमा निश्चित केल्या आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी अवघड
असणाऱ्या प्रभागाला ज्या भागातून हक्काचे मतदान मिळते, असा
भाग जोडून निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे, अशीही
टीका विरोधकांनी केली होती. त्यामुळे पुढच्या चार दिवसांमध्ये प्रारूप प्रभागरचना
जाहीर झाल्यावर प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका निवडणुकीसाठी
प्रारूप रचना सोमवार दि.४ ऑगस्ट २०२५ ला महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या
नगरविकास विभागाला सादर केली. ३२ गावांच्या समावेशामुळे प्रभागरचनेत मोठे बदल
झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याचवेळी २०१७ ची प्रभागरचना प्रमाण मानून २०२५ ची
रचना याच पद्धतीने केल्याचे प्रशासनाने सांगितले होते. त्याचप्रमाणे १६५
नगरसेवकांसाठी ३९ प्रभाग चार सदस्यांचे, तर ३ प्रभाग ३ सदस्यांचे असणार असून, हे ३
प्रभाग कोणते असावेत, यासाठी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली
असल्याचे बोलले गेले. त्यामधील काही प्रभागांचे नकाशे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते,
तर काही प्रभागांच्या आराखड्याबाबत बहुतांशी सर्वच राजकीय पदाधिकारी
कार्यकर्त्यांना माहिती असल्याच्या चर्चा आहेत.
विरोधकांची
वाढली धाकधूक
२०१७ ची
प्रभागरचना करताना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हद्दी, रस्ते, लोहमार्ग, उड्डाणपूल ओलांडून प्रभाग तयार केले होते.
त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. या प्रभागरचनेचा
काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला होता.
आता यावेळी २०१७ ची प्रभागरचना डोळ्यासमोर ठेवून प्रभाग केले आहेत. त्यामुळे
विरोधातील महाविकास आघाडीतील इच्छुकांची काळजी वाढली आहे. तर ३२ गावे व ४ लाख
लोकसंख्या वाढल्याने २०२२ च्या प्रारूप प्रभाग रचनेच्या पद्धतीने तर हि रचना होणार
नाही ना? आरक्षणे कशी पडतील? कोणत्या मतदार संघात ओबीसी आणि एससी, एसटी आरक्षणे
पडतील याबाबत आडाखे मांडण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक प्रभागांमध्ये “असा प्रभाग
पडल्यास, तसे आरक्षण पडू शकते” असा अभ्यासू कयास मांडून तसे प्रभाग करण्यासाठी
काहीजण उघड, तर काहीजण दुसऱ्याच्या कानाला लागून आपले इरादे साध्य करण्याच्या
प्रयत्नात असल्याचे दिसतात.
कधी काय
होणार?
निवडणूक
आयोगाकडून २२ ऑगस्ट २०२५ ला प्रारूप प्रभागरचना जाहीर होईल. त्यावर २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत
हरकती सूचना मागवल्या जाणार आहेत. हरकती आणि सूचनांवर २९ ऑगस्ट २०२५ ते ८ सप्टेंबर
२०२५ दरम्यान प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेतील जाईल. त्यानंतर आवश्यक ते
बदल करून अंतिम केलेली प्रभागरचना ९ सप्टेंबर २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान नगरविकास
विभागाला सादर केली जाईल. सरकारकडून २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत ती निवडणूक आयोगाला
सादर केली जाईल. त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२५ ते ६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पुणे
महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर होऊ शकते. हि प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर
लगेचच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्यतो
नोव्हेंबर मध्येच या निवडणुका लागू शकतात अन्यथा थेट जानेवारी - फेब्रुवारी मध्ये
त्या घ्याव्या लागतील असा अंदाज राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील
लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

