Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. ९
ऑगस्ट २०२५ (Checkmate Times): राखीपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि
शहराच्या बाहेरून जाणाऱ्या कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
पहायला मिळत आहे. विशेषतः कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाजवळ असलेल्या चांदणी चौक,
पौड रस्ता, वारजे, एनडीए रस्ता, नवले पूल, सिंहगड रस्ता, कात्रज, धनकवडी, सातारा
रस्ता, कात्रज कोंढवा रस्ता, खेड शिवापूर भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीने
वाचानाचालक त्रस्त झालेले आहेत. या त्रस्त वाहनचालकांनी आणि माध्यमांनी याबाबत
सोशल मिडीयावर एकच गदारोळ केल्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून
जागे झाले आहे. रस्ते मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी पुणे सातारा लेनच्या
अधिकाऱ्यांचे कान टोचले असून, त्यांनी आता या रस्त्यावरील वाहतूक कोंडी
सोडवण्यासाठी गेले अनेक महिने धूळ खात पडलेल्या विषयाला हात घातला आहे. या
रस्त्यात असलेल्या अतिक्रमणांना आता महामार्ग प्राधिकरणाने नोटीसा बजावल्या असून,
अनधिकृत बांधकामे काढून घेण्यासाठी फर्मावले आहे.
मुंबई-बंगळुरू एनएच ४८ या राष्ट्रीय महामार्गांवर सातत्याने होणारी वाहतूक
कोंडी सोडविण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने
(एनएचएआय) मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत १५० पेक्षा अधिक बेकायदा बांधकामे
पाडल्यानंतर आता अतिक्रमण करणाऱ्या आणखी १०० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या
मार्गांवरील नगर परिषद, महापालिका आणि ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अतिक्रमणे आणि कचरा काढण्यासाठी
संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनाही ‘एनएचएआय’ने नोटिसा बजावल्या आहेत.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ आणि २०२४ या वर्षांमध्ये सुमारे पाच हजार अपघात
झाले असून, दोन हजार २२६ जणांचा
मृत्यू झाला आहे. या वर्षातही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘एनएचएआय’ने स्थानिक
पोलीस, वाहतूक पोलीस आणि
महापालिकांच्या साहाय्याने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून ही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. १५ मार्च
ते १५ मे २०२५ या कालावधीत अतिक्रमणे करणाऱ्या ७० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या
होत्या. त्यामध्ये नवले पूल ते खंडाळा या मार्गावरील ३२ आणि खेडशिवापूर-वडगाव या
मार्गावरील ४५ जणांचा समावेश होता. तसेच, या महामार्गांवरील अन्य ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांनाही नोटिसा देण्यात
आल्या आहेत. आता आणखी १०० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटीस दिल्यावर
काहींनी स्वत:हून बांधकामे पाडली असल्याचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.
महामार्ग पोलिसांनी केलेल्या सूचनांनुसार ‘एनएचएआय’कडून स्थानिक स्वराज्य
संस्था, वाहतूक पोलीस आणि इतर
संस्थांच्या माध्यमातून अपघातप्रवण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
त्यानुसार नवले पूल, वारजे, वडगाव पूल, कात्रज बोगदा, भोर फाटा, खेड शिवापूर, खंडाळा, कात्रज घाट या आठ
ठिकाणी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. महामार्गावरील अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध
आणि कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या
मार्गांवर आपत्कालीन परिस्थितीत वाहन थांबवणे कठीण झाले आहे. त्यामुळे
प्राधिकरणाने संबंधित आस्थापना आणि नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे
एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील
लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

