Type Here to Get Search Results !

धायरी मधील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध; नांदेड सिटी पोलिसांची कामगिरी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha


Innkeeper in Dhayari jailed for one year; Nanded City Police's performance


 

पुणे, दि. ७ ऑगस्ट २०२५ (Checkmate Times): नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात राहणाऱ्या आणि पुणे पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असलेल्या धायरी मधील एका सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, त्याला १ वर्षासाठी बुलढाणा येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या माध्यमातून हि कारवाई करण्यात आली आहे. कोल्हेवाडी मध्ये एका सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक केले होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच कोल्हेवाडी भागात झालेला गोळीबार झाला. या पार्श्वभूमीवर केलेल्या या कारवाईने चर्चांना उधाण आले आहे.

 




 असून तो सन २०२१ पासून आपल्याजवळ कोयत्यासारखी घातक शस्त्रे जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, सारखे गुन्हे केले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्याची मोठी दहशत निर्माण झाले आहे. त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम झाला नाही. त्याच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्या भितीमुळे नागरीक उघडपणे तक्रार देण्यास तयार होत नव्हते. या पार्श्वभूमीवर गुन्हेगार साईनाथ शिवाजी उभे (वय २३ वर्षे, रा. जाधवनगर, रायकर मळा, धायरी, पुणे) यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे.

 




पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव, कैलास केंद्रे, अनिल बारड यांनी एम.पी.डी.ए. प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाची पडताळणी करून, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरिल सराईत गुन्हेगार साईनाथ शिवाजी उभे यास एम.पी.डी.ए. कायदयान्वये बुलढाणा कारागृह, बुलढाणा येथे एक वर्षे स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारित केला. सदर आरोपी यास अंमलदार भिमराज गांगुर्डे आणि निलेश खांबे यांनी गोपनिय माहिती काढुन ताब्यात घेतले.

 




वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.