Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. ७
ऑगस्ट २०२५ (Checkmate Times): “तुम्हाला सोलर पॅनल सरकारी सबसीडी व स्वस्त दरात देतो”
असे आमिष दाखवून ग्राहकांकडून पैसे घेत, सोलर न बसवता फसवणूक करणाऱ्या ठगाला वारजे
पोलिसांनी गजाआड केले आहे. वारजे मध्ये राहणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत
तक्रार दिली होती. आतापर्यंत त्याने चार ते पाच जणांची फसवणूक केली असल्याच्या
तक्रारी इतर तक्रारदारांनी केल्या असून, वारजे पोलीस तपास करत आहेत.
याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा पुणे सातारा रस्त्यावर पेट्रोल पंप
असून, त्यांना त्यांच्या पेट्रोलपंपामध्ये सोलर पॅनल बसवायचा होता. याबाबत त्यांनी
त्यांच्या मित्राला सांगितले होते. त्यांच्या मित्राच्या संपर्कातून त्याचे ओळखीच्या
असलेल्या सोलर पॅनल खरेदी विक्री करणाऱ्या विक्रेत्याबाबत माहिती दिली. त्यानुसार
त्यांनी त्या विक्रेत्याला संपर्क केला असता, त्याने “मी तुम्हाला सोलर पॅनल
सरकारी सबसीडी व स्वस्त दरात देतो” असे सांगितले. तर शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४
रोजी सोलर पॅनलच्या व्यवहारासंबंधी बोलण्याकरीता, सदरील ठग असलेला विक्रेता फिर्यादींच्या
वारजे मधील राहत्या घराजवळ भेटण्यासाठी आला. यावेळी झालेल्या चर्चेच्या दरम्यान त्याने
“आज तुम्ही मला पूर्ण पेमेंट दिले, तर आपणास सबसीडी मिळेल,
सबसीडीचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे तुम्हाला १० लाख
रुपयाचे सोलर पॅनल, हे फक्त ४ लाख ७० हजार रुपयाला मिळतील व ते मी तुम्हाला आठ
दिवसांत बसवून देतो” असे सांगत विश्वास संपादन केला.
दरम्यान
फिर्यादींनी ठरलेली रक्कम विक्रेत्याला ऑनलाईन पेमेंट करत ट्रान्सफर केले. मात्र
पैसे मिळाल्यानंतर त्याने सुरवातीला आठ दिवस, दहा दिवस कारणे सांगितली आणि नंतर
फोन न उचलता सोलर बसवण्यास टाळाटाळ केली. विक्रेत्याच्या या कृतीमुळे फिर्यादींना
आपली फसवणूक झाली असल्याचे लाक्षत आले. यावेळी फिर्यादींनी त्यांच्या मित्रांना
याबाबत सांगितले असता त्यांनी, फिर्यादींच्या प्रमाणेच आणखीन चार जणांची त्या
विक्रेत्याने पैसे घेऊन फसवणूक केली असल्याचे समोर आले. यानंतर फिर्यादींनी वारजे
पोलिसांत तक्रार अर्ज देत, विक्रेत्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला.
दरम्यान वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस
निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप बबन जामदार (वय ३६ वर्षे, रा. मु.पो.भेंडा
बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या मॉडर्न सोलर
सिस्टीमच्या नावाने सोलर सिस्टीमसाठी पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्याला अटक केली असून,
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे करत आहेत. तसेच इतरही अनेकांची याने
फसवणूक केली असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील
लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

