Type Here to Get Search Results !

उत्तमनगर मध्ये मटक्याच्या अड्ड्यावर छापा; जवळपास ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, 23 जणांवर कारवाई

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Raid on Matka Gambling in Uttamnagar; Nearly 3 lakh worth of valuables seized, action taken against 23 persons


 

Raid on Matka Gambling in Uttamnagar; Nearly 3 lakh worth of valuables seized, action taken against 23 persons

 

पुणे, दि. 5 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर (Uttamnagar) मध्ये पोलिसांची नजर चुकवून बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर (Matka Gambling Adda) उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) आणि पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Pune Police Social Security Cell) संयुक्त विद्यमाने कारवाईचा बडगा उगारत, मटका घेणाऱ्या आणि खेळणाऱ्या 23 जणांवर कारवाई करत, तब्बल 2 लाख 85 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत किशोर नानासाहेब भुजबळ (Kishor Nanasaheb Bhujbal) (पोलीस शिपाई, सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर) यांच्या फिर्यादीवरून उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस फौजदार शिवाजी दबडे (ASI Shivaji Dabade) पुढील तपास करत आहेत.

 


 


याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ए. के. मार्केट (AK Market) मध्ये असलेल्या एका दक्षिणमुखी पत्र्याच्या शेड मध्ये पोलिसांची नजर चुकवून, बेकायदेशीरपणे मटका अड्डा सुरु झाला असल्याची विश्वसनीय खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानुसार, उत्तमनगर पोलिसांनी, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.4 डिसेंबर 2023 दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून, मटका घेणाऱ्या आणि खेळणाऱ्या 23 जणांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून 39 हजार 950 रुपयांची रोख रक्कम, 2 लाख 46 हजार रुपये किमतीचे 13 मोबाईल, कल्याण मटका (Kalyan Matka) जुगाराचे साहित्य, 3 पॅड, 3 निळ्या शाईचे बॉलपेन, कल्याण मटका जुगाराच्या चिठ्ठया असा एकुण 2 लाख 85 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील नमुद संशयितांवर स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे लावुन कल्याण मटका हा जुगार खेळवत व खेळत असताना मिळुन आले म्हणून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम (Maharashtra Gambling Prohibition Act) कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 


 


यामध्ये लक्ष्मण दुधा शिंदे (वय 54, रा. किरकटवाडी, खडकवासला, पुणे), मधुकर प्रभाकर बोकन (वय 52, रा. पेट्रोल पंपाजवळ, मोरे कॉलनी, शिवणे, पुणे), दत्तात्रय सखाराम जाधव (वय 38, रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, चरवड वस्ती, म्हसोबा मंदीराजवळ, वडगाव. बु//, पुणे) हे जुगार अड्डा मालक आणि विकास रमेश पाटील (वय 26, रा. वैदुवाडी, हडपसर, पुणे) यांचे सांगणेवरुन बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार घेत असताना व इसम नामे सचिन देविसींग गिरासे (वय 29), लाल बहादुर थापा (वय 25), राम निवृत्ती पवळ (वय 47), तुलाराम डंबरबहादुर वीके (वय 26), दानसिंग जंगे बिस्ट (वय 40), माणिकराम सियाराम यादव (वय 50), अशोक बबन गायकवाड (वय 57), लेटराम शामु साहु (वय 37), किशोर उपय्या मरकुटे (वय 21), अभिजीत बदन शेळके (वय 36), ख्वाजा रुकमद्दीन मारतुर (वय 48), आदीनाथ कैलास कांबळे (वय 26), गोपाळ मारुती रापेलीवार (वय 34), विरेश मल्लीकार्जुन जिवानगी (वय 30), अरुण अशोक वरगडे (वय 32), अझहरुद्दीन इकबाल कुरेशी (वय 34), महेंद्र जगन्नाथ तावरे (वय 47), दिनेश राजु गायकवाड (वय 25), दिनेश इंदोर सोलंकी (वय 35) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.