Type Here to Get Search Results !

वारजे माळवाडी मधील आम्रपाली हॉटेल जवळ एकाला लुटले

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 3 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील आम्रपाली हॉटेल (Amrapali Hotel) जवळ एका तरुणाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून, त्याच्याकडील 41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलिसात (Warje Police Station) त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. (Pune Crime News)

हेही वाचा - पोलीस खरे आहेत का खोटे याची अगोदर खात्री करा; पोलीस असल्याच्या बतावणीने पादचारी तरुणाला लुटले

याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ बालाजी पांचाळ (Somnath Balaji Panchal) (वय- 38, रा.वारजे माळवाडी, पुणे) हा बुधवार दि. 1 मार्च 2023 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास आपल्या दुचाकी मोटारसायकलवरून हॉटेल आम्रपाली रेस्टॉरंट अँड बार जवळ थांबलेल्या त्याच्या नातेवाईकांना भेटायला, बंगलोर मुंबई महामार्गाच्या (Banglore-Mumbai Highway) बाजूला असलेल्या वारजे पूल (Warje Bridge) ते आरएमडी कॉलेज सर्व्हिस रस्त्यावरील (RMD College Service Road) केटीएम बाईक शोरूम (Warje KTM Bike Showroom) समोरून जात होता. यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला गाडी वाकडी तिकडी का चालवतो म्हणून अडवले.

यावेळी त्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने सोमनाथ पांचाळ यांच्या खिशातील 1200 रुपये रोख आणि 40 हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची चेन असा 41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल बळजबरी करून, हिसकावून पळून गेले. रात्री फक्त साडे अकरा वाजता, वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने चर्चांना उधाण आले असून, या भागात गस्त वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे. याबाबत सोमनाथ पांचाळ याने वारजे पोलिसात तक्रार दिली असून, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे (Police Sub-Inspector of Warje Police Station Rameshwar Parve) पुढील तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.