Type Here to Get Search Results !

कर्वेनगर, वारज्यात पदपथांवर लावलेले फ्लेक्स पादचाऱ्यांसाठी ठरत आहेत जीवघेणे; मांडववाल्यांवर गुन्हे दाखल होणार?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, checkmate news, chekmet news



पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय (Warje Karvenagar Ward Office) हद्दीतील कर्वेनगर (Karvenagar) आणि वारजे (Warje) भागातील पदपथावर (Pedestrian Pathway) मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स (Flex Banners) लावण्यात आले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत असल्याबाबत नागरिक तक्रारी करू लागले आहेत. मात्र याकडे वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा आकाशचिन्ह विभाग (PMC Sky Sign Department) सारासार दुर्लक्ष्य करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

कर्वेनगर मधील दुधाने लॉन्स (Dudhane Lawns) ते वेदांत मंगलम हॉल (Vedant Mangalam) भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल (Bharat Ratna Dr. A. P. J. Abdul Kalam E Learning School) या डीपी रस्त्यावर (DP Road) सकाळच्या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉल्कला (Morning Walk) येत असतात. मात्र स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल (Swaraj Rakshak Sambhaji Maharaj Sports Complex) समोर एका पक्षाच्या क्रीडा स्पर्धांचा फलक अशाप्रकारे लावण्यात आला आहे की, पादचाऱ्यांचा कपाळ मोक्ष होऊ लागला आहे. याबाबत मॉर्निंग वॉल्कला आलेल्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तो तातडीने काढून टाकण्याची मागणी होऊ लागली आहे.

 

त्याचबरोबर वारजे बस स्टॉप जवळील पाटलु चौधरी शाळेशेजारी (PMC Patlu Chaudhari School) असलेल्या एका हॉटेल जवळ एका संस्थेचा फलक देखील त्याचं पद्धतीने पूर्ण पदपथ अडवून लावण्यात आलेला असून, त्याच्या खालून नागरिकांना जावे लागत आहे. जर या फलकाच्या खालून गेले नाही, तर रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालण्याची वेळ येते आहे. शेजारी शाळा आहे आणि या शाळेत येणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना रस्त्यावरून जाताना एखाद्या वाहनाचा धक्का लागून अपघात झाल्यास, त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या फलकावर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा (Guardian Minister) देखील फोटो असल्याचे दिसते.

 

एकूणच ज्यांना आपल्या जाहिराती करायच्या आहेत, त्या देखील होत राहतील आणि संभाव्य दुर्घटना टळतील याची दक्षता घेत पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने किमान पादचारी मार्ग रिकामे राहतील याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. त्याकरिता जे मांडववाले सदरील फलक लावतात, त्यांना वेळीच समज दिली. शहराचे बकालीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची थोडी हिती जरी दाखवली, तरी सामान्य पादचारी पदपथावरून सुरक्षितपणे चालू शकेल, असेही मत व्यक्त केले जाऊ लागले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.