Type Here to Get Search Results !

सर्वांगीण वाचन हा प्रभावी वक्तृत्वाचा पाया; वकृत्व स्पर्धेत डॉ. केशव तुपे यांनी व्यक्त केल्या भावना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Comprehensive reading is the foundation of effective speaking; Sentiments expressed by Dr. Keshav Tupe on


 

Comprehensive reading is the foundation of effective speaking; Sentiments expressed by Dr. Keshav Tupe at Oratorical Competition

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2024 (चेकमेट टाईम्स): सखोल वाचन आणि व्यासंग याद्वारेच वक्तृत्व स्पर्धाचे (Oratorical Competition) सिंहासन जिंकता येईल. विद्यार्थांनी ग्रंथालयात (Library) जाऊन ग्रंथांचे सखोल वाचन (Deep Reading) करणे आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीला तरुणाई सोशल मिडिया (Social Media) मध्ये गुंतलेली असून, त्याच युवा पिढीवर राष्ट्र संवर्धनाची (Conservation of Nation) जबाबदारी आहे. त्यामुळे तरुणांनी सोशल मिडियामागे भरकटत न जाता त्याचा फक्त सदुपयोग करावा अशा प्रकारच्या भावना डॉ. केशव तुपे (Dr. Keshav Tupe) यांनी व्यक्त केल्या. वारजे मधील संस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालयात (Sanskar Mandir College of Arts and Commerce Warje Pune) माजी उपमहापौर दिलीप बराटे (Former Deputy Mayor PMC Pune Dilip Barate) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

 


 


याप्रसंगी दिलीप बराटे यांच्यासह, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात (Principal Dr. Rajendra Thorat), प्रा. आशुतोष कसबेकर (Prof. Ashutosh Kasbekar), सुजित काळंगे (Sujit Kalange) उपस्थित होते. यावेळी बोलताना दिलीप बराटे म्हणाले की, अध्यापकांनी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थांच्या विचारांच्या कक्षा रूंदावणे (Broadening the Horizons of Thought) आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक भूक (Cultural Hunger) भागवण्यासाठी देखील प्रयत्न करायला हवा. साहित्य, कला, शिल्प, संगीत, खेळ या क्षेत्रात विद्यार्थांनी भरीव योगदान देणे विकसित भारतासाठी आवश्यक असल्याचे मत बराटे यांनी यावेळी विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात यांनी केले. यावेळी त्यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करून, स्पर्धकांचे स्वागत केले. राज्यभरातून 32 स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत डॉ. प्राजंली विद्यासागर (Dr. Pranjali Vidhyasagar) यांनी सूत्रसंचालन केले. तर परीक्षणाची (Examination) महत्त्वपूर्ण जबाबदारी डॉ. पाडुरंग कंद (Dr. Panduranga Kand) व प्रा. सुशील धसकटे (Prof. Sushil Dhaskate) यांनी पार पाडली. पारितोषिकांचे वितरण हरीश नवले (Harish Navale) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अविनाश जाधव (Avinash Jadhav), डॉ. देवेंद्र भावे (Dr. Devendra Bhave), आशुतोष निकम (Ashutosh Nikam), रोहन कवडे (Rohan Kawade) उपस्थित होते.

 


 


या स्पर्धेत रोख 5 हजार रुपये, करंडक व प्रमाणपत्र असे बक्षीस असलेला प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) इरफान शेख याने पटकावला (First Price of Oratorical Competition Irfan Shaikh). 3 हजार रुपये रोख, करंडक व प्रमाणपत्र असलेला द्वितीय क्रमांक आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अक्षय चौरे (Abasaheb Garware College Akshay Chaure) याने, 2 हजार रुपये रोख, करंडक व प्रमाणपत्र असलेले तृतीय क्रमांकाचे बक्षीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चैतन्य बनकर (Chaitanya Bankar) याने पटकावले. यावेळी तेजस पाटील (Tejas Patil) आणि तन्वी कांबळे (Tanvi Kambale) यांना उत्तेजनार्थ 1 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र. तर क्षितिजा मेटकरी (Kshitija Metkari) आणि अभय आळशी (Abhay Alshi) यांना 500 रुपये रोख आणि प्रमाणपत्र उत्तेजनार्थ देण्यात आले. दिलीप बराटे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणारे हे या वकृत्व स्पर्धांचे पाचवे वर्ष होते. तर दरवर्षी या अवघड अशा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे समाधान प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात यांनी व्यक्त केले.


 

 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.