Type Here to Get Search Results !

फांद्या छाटायाची परवानगी घेऊन पिंपळाच्या झाडाची मुळासकट कत्तल?; वारजे मधील प्रकाराने वृक्षप्रेमी संतप्त

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Slaughter of Pipal Tree by root with permission to cut branches?; Enrages Tree Lovers in Warje


Slaughter of Pipal Tree by root with permission to cut branches?; Enrages Tree Lovers 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील मुख्य रस्त्यावर भर दिवसा एका भल्या मोठ्या “वृक्षतोड प्रतिबंधित असलेल्या देशी पिंपळ प्रकारातील झाडाची (Native Tree with Logging Restrictions) कत्तल करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.” विशेष म्हणजे या 25 वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या छाटण्याची परवानगी पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून (Tree Cutting Permission by PMC Pune Garden Department) देण्यात आली होती. मात्र कागदावर देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी शर्थींना हरताळ फासत (Violation of Terms and Conditions) ही वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी (Tree Lovers) केला आहे. तर संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून करण्यात आली आहे.

 


 


वारजे माळवाडी मधील दिगंबरवाडी शाळेकडे (Digambarwadi School) जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर, सर्व्हे नं. 132, एनडीए रोडवर (NDA Road) असलेल्या परमानंद बिल्डींग (Parmanand Building) समोर सदरील प्रकार घडला. याबाबत एका वृक्षप्रेमीने केलेल्या तक्रारीनंतर सदरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा वृक्ष तोडला जात असताना वृक्षप्रेमीने हरकत (Objection of Tree Cutting) देखील घेतली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष्य करत, पालिकेने दिलेल्या परवानगीची सबब दिली गेली. मात्र परवानगी मधील नियम आणि अटींचे पालन केले गेले नसल्याचा आरोप वृक्षप्रेमीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने झाडावर असलेली पक्षांची घरटी (Bird's Nest) योग्य त्या ठिकाणी सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्याच्या नियमाचे पालन न करता वृक्षाच्या फांद्या तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर झाडाचा विस्तार कमी करण्याची परवानगी देण्यात आलेली असताना, आता प्रत्यक्ष जागेवर फक्त खोड शिल्लक ठेवण्यात आलेले आहे. हे समोर दिसत असले तरी या झाडाच्या खोडाला देखील खाली काप देण्यात आले आहेत, किंबहुना खोड (झाड) पूर्णच नष्ट करण्याचा इरादा वृक्ष तोडणाऱ्याचा होता. मात्र वृक्षाप्रेमीने घेतलेल्या हरकती नंतर ते अर्धवट सोडून देण्यात आले आहे. असे असले तरी भविष्यात हे उरलेले खोड सुकवण्याचे प्रयोजन झाले असल्याचा आरोप या वृक्षप्रेमीने चेकमेट टाईम्सशी बोलताना केलाय. त्यामुळे वृक्ष तोडण्याची परवानगी घेणाऱ्यापासून वृक्ष तोडणाऱ्या ठेकेदारापर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी वृक्षप्रेमिंकडून करण्यात आली आहे.

 


Slaughter of Pipal Tree by root with permission to cut branches?; Enrages Tree Lovers in warje


 

नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करू: बाळासाहेब डोळस

संबंधित व्यक्तीस विस्तार कमी करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात येईल. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून वृक्षतोड झाली असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. परवानगी देताना संबंधिताना नियमांचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली होती, अशा प्रकारची भूमिका वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे वृक्ष निरीक्षक (हार्टीकल्चर मिस्त्री) बाळासाहेब डोळस यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. (Balasaheb Dolas, Tree Inspector (Horticulture Engineer) Warje Karvenagar Word Office PMC Pune)

 


 


स्वत:चे फायद्यासाठी स्ट्रीट लाईट दिव्याची दिशाही बदलली

झाडाची कत्तल करत असताना संबंधित व्यक्तीने खालील दुकानांच्या फलकांवर प्रकाश पडेल, रस्त्या ऐवजी आपल्या दुकानांच्या दारात प्रकाश पडावा यासाठी पालिकेच्या पथदिव्याची दिशाही बदललेली दिसत असून, त्यामुळे रस्त्यावर मात्र अंधार होत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे. हा पथदिवा पूर्ववत रस्त्याकडे तोंड करून करावा आणि इतरत्र देखील कुठे असे प्रकार झाले आहेत का? याची पाहणी क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाने करावी अशी मागणी वाहनचालकांकडून पुढे आली आहे. (Street Light Focus Diverted on Personal Interest)

 

Slaughter of Pipal Tree by root with permission to cut branches?; Enrages Tree Lovers in warje

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.