Type Here to Get Search Results !

बाणेर बालेवाडी भागातील हॉटेल्स, पब’वर पुणे महानगरपालिकेची चार दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

Pune Municipal Corporation action for the second time in four days on hotels, pubs in Baner Balewadi area


Pune Municipal Corporation action for the second time in four days on hotels, pubs in Baner Balewadi area 


पुणे, दि. 29 मे 2024 (Checkmate Times): पुणे महानगरपालिका (PMC Pune) बांधकाम परवाना विभागाकडून शनिवार दि.25 मे 2024 रोजी बाणेर (Baner) भागात करण्यात आलेल्या हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई नंतर आज बुधवार दि.29 मे 2024 पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारत तेरा ते चौदा हॉटेल्स आणि पब्ज वर कारवाई करून 52 हजार 848 चौरस फुट क्षेत्रफळ अनधिकृत बांधकाम आणि पत्राशेड वर निष्कासन कारवाई करण्यात आली.

 

 

कल्याणीनगर (Kalyani Nagar) मध्ये घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर आता रूफ टॉप हॉटेल्स (Roof Top Hotels) आणि पब्जच्या (Pubs) अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे महानगरपालिकेला आता अनधिकृत (PMC Pune) रूफ टॉप हॉटेल (Roof Top Hotels in Pune) आणि पब्ज स्पष्ट दिसू लागली आहेत. एकामागे एक दररोज शहराच्या विविध भागांमध्ये रूफ टॉप हॉटेलवर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून (PMC Pune Construction Department) कारवायांचा धडाका सुरु करण्यात आला आहे. कोथरूड विधानसभा (Kothrud Vidhansabha) मतदार संघातील बाणेर (Baner) मध्ये चार दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाई नंतर आता याच मतदार संघात आणखीन अशीच एक कारवाई आज बुधवार दि.29 मे 2024 बाणेर बालेवाडी मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये 13 ते 14 हॉटेल आणि पब्ज’च्या अनधिकृत पत्रा शेड आणि बांधकामावर निष्कासन (illegal Construction Demolished) कारवाई करण्यात आली आहे.

 

 

पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर (Shridhar Yeolekar), बांधकाम विभाग झोन क्र.3 चे कार्यकारी अभियंता जयवंत पवार (Jaywant Pawar) यांचे मार्गदर्शनाखाली, उप अभियंता प्रकाश पवार (Prakash Pawar), कनिष्ठ अभियंता विश्वनाथ बोटे (Vishwanath Bote), संदीप चाबुकस्वार (Sandeep Chabukswar), अजित सणस (Ajit Sanas), केतन जाधव (Ketan Jadhav), 4 अतिक्रमण विभागाचे पोलिस, 6 सुरक्षा रक्षक यांच्या पथकाने 2 जेसीबी, 2 गॅस कटर, 2 ब्रेकर, 10 अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने, बालेवाडी व बाणेर भाग येथील बालेवाडी हाय स्ट्रीट (Balewadi High Street) परिसरातील फीस्ट इंडिया (Feast India Co. Awadhi & Asian Restaurant), दार्जिलिंग कॅफे (Darjeeling Cafe), ब्र्यू कॅफे (Brew Culture / Brew Cafe), ग्लोबल चस्का (Global Chaska), डॉक यार्ड (Dockway Kitchen and Bar), पंजाबी कॉर्नर (Punjabi Chaap Corner), जगदंबा हॉटेल (Jagdamba Hotel), सर्किट हाऊस (Circuit House - Balewadi High Street), मदारी (Madari Resto Bar) इत्यादी हॉटेल्स आणि हिप्पी अँड हार्ट (Hippie @ Heart Balewadi), नवाब आशिया (Nawab Asia), लिट (#LIIT - Live IIT Today), अपाची हायस्ट्रीट (Apache High Street), थ्री मोस्कुटोज (The 3 Musketeers Pub - Baner) इत्यादी पबच्या चौपाटीचे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम मिळून 52 हजार 848 चौरस फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.