Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today
Pune Municipal Corporation Unauthorized Construction Department action on
these 4 roof top hotels in Kothrud
पुणे, दि. 27 मे 2024 (Checkmate Times): कल्याणीनगर
(Kalyani Nagar) मध्ये घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर आता पुणे
महानगरपालिकेला (PMC Pune) रूफ टॉप हॉटेल (Roof Top
Hotels in Pune) स्पष्ट दिसू लागली आहेत. एकामागे एक दररोज शहराच्या विविध भागांमध्ये रूफ
टॉप हॉटेलवर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून (PMC Pune
Construction Department) कारवायांचा धडाका सुरु करण्यात आला आहे.
कोथरूड विधानसभा (Kothrud Vidhansabha) मतदार संघातील बाणेर (Baner) मध्ये दोन
दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाई नंतर आता याच मतदार संघात आणखीन अशीच एक
कारवाई आज सोमवार दि.27 मे 2024 कोथरूड (Kothrud) मध्ये करण्यात आली
आहे. यामध्ये 4 रूफ टॉप हॉटेलच्या अनधिकृत पत्रा शेड आणि बांधकामावर निष्कासन (illegal Construction
Demolished) कारवाई करण्यात आली आहे.
पुणे
महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश बनकर (Rajesh
Bankar), बांधकाम विभाग झोन क्र.6 चे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे (Bipin
Shinde) यांचे मार्गदर्शनाखाली, उप अभियंता श्रीकांत गायकवाड (Shrikant Gaikwad), कनिष्ठ
अभियंता मनोजकुमार मते (Manojkumar Mate), सागर शिंदे (Sagar
Shinde), राहुल रसाळे (Rahul Rasale), समीर गडाई (Samir
Gadai) व सहाय्यक गणेश ठोंबरे (Ganesh Thombare), ऋषिकेश जगदाळे (Hrishikesh
Jagdale) यांच्यासह अतिक्रमण विभागाचे 6 पोलिसांचे पथक, 1 जेसीबी, 2 गॅस कटर, 1 ब्रेकर, 10
अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने, हॉटेल नक्षत्र रेस्टो बार (Hotel
Nakshatra Resto Bar, Kothrud, Pune), स्पाइस गार्डन (Spice Garden,
Kothrud, Pune), कोरियडेर लिफ रेस्टोरंट (Coriander Leaf Restaurant, Kothrud, Pune),
हॉटेल टेस्टी बेस्टी (Tasty Bestie Kitchen and Cafe, Kothrud,
Pune) या हॉटेलवर कारवाई करून, सुमारे 10 हजार 349 चौरस फूट क्षेत्र निष्कासित
करण्यात आले असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर
वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share