Type Here to Get Search Results !

दहावीच्या निकालावर कोकणचा डंका; यावर्षीची ही वैशिष्ठ्ये तुम्हाला माहित आहेत का?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

 

Konkan Stings on SSC Results; Do you know these Features this year?

Konkan Stings on SSC Results; Do you know these Features this year?

 

पुणे, दि. 27 मे 2024 (Checkmate Times): दहावीच्या या परीक्षेस (SSC Exam) राज्यातील पुणे (Pune), नागपूर (Nagpur), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), अमरावती (Amrawati), नाशिक (Nashik), लातूर (Latur) व कोकण (Kokan) या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 60 हजार 154 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण (SSC Results Maharashtra) झाले. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 95.81 आहे.

 

या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25 हजार 770 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी (Re-examination Students) नोंदणी केली होती. त्यापैकी 25 हजार 327 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 12 हजार 958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 51.16 टक्के आहे.

 

 

या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25 हजार 894 खाजगी विद्यार्थ्यांनी (Private Students) नोंदणी केली होती. त्यापैकी 25 हजार 368 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 20 हजार 403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.42 टक्के आहे.

 

या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 9 हजार 149 दिव्यांग विद्यार्थ्यांनी (Students with Disabilities) नोंदणी केली होती. त्यापैकी 9 हजार 78 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8 हजार 465 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.25 टक्के आहे.

 

 

या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण 16 लाख 11 हजार 818 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 लाख 21 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून, त्यापैकी 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.86 टक्के आहे.

 

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (SSC Konkan Devision Result) 99.01 टक्के हा सर्वाधिक असून, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (SSC Nagpur Devision Result) 94.73 टक्के आहे.

 

सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची (SSC Girls) टक्केवारी 97.21 टक्के असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.56 टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 2.65 टक्के जास्त आहे.

 

 

एकूण 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

 

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 58 हजार 21 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 5 लाख 31 हजार 822 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 3 लाख 14 हजार 866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 79 हजार 732 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

 

राज्यातील 23 हजार 288 माध्यमिक शाळांतून 15 लाख 60 हजार 154 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9 हजार 382 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.