Headlines
Loading...
अनिता इंगळे यांच्याकडून सायकल मिळाल्याने विद्यार्थिनी झाल्या आनंदी; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

अनिता इंगळे यांच्याकडून सायकल मिळाल्याने विद्यार्थिनी झाल्या आनंदी; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

 

पुणे, दि. २४ (चेकमेट टाईम्स): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता इंगळे यांच्या माध्यमातून शिवणे उत्तमनगर परिसरातील विद्यार्थिनींना सायकल वाटप, नागरिकांना ५ हजार “पाम ट्री”चे वाटप, शिंदे पूल ते कोंढवे धावडे रस्त्याच्या कडेने “पाम’ची झाडे” लावून, रस्त्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच, शिवणे स्मशानभूमी रस्त्यावर देखील नदीच्या कडेला पाम’ची झाडे लावून तो भाग देखील सुशोभित करण्यात आलाय. त्यामुळे जसा नवी मुंबई मधील एका रस्त्याला जसे “पाम बीच रोड”  म्हटले जाते, तसे पुढील काळात “एनडीए पाम रोड” म्हटल्यास वावगे वाटायला नको. यावेळी नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. अनिता इंगळे यांच्या माध्यमातून आणखीन एक मोठा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला तो म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसापासून पालकमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसापर्यंत वटवृक्ष वाटपाचा उपक्रम हाती घेऊन जवळपास २ हजार वटवृक्ष वाटून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यामुळे पुढील काळात या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, कोपरे भाग हिरवागार आणि प्राणवायूयुक्त होण्यास मदत होणार आहे.

विकासपुरुष’ला पुण्यात धडाकेबाज उत्तर; नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भाजपा मध्ये पोस्टर वॉर

यावेळी उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, राष्ट्रवादी खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शुक्राचार्य वांजळे, नगरसेविका सायली वांजळे, माजी सरपंच सुरेश गुजर, अतुल दांगट, विकास दांगट, अतुल अप्पा धावडे, गणेश राऊत, दत्ता पायगुडे यांच्यासह जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षिका, परिसरातील महिला आणि पालकांसह पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,

 वाचण्यासाठी क्लिक करा: माझ्या लोकसभा मतदार संघात तर मी ठरवलंय; सुप्रिया सुळे यांची आगामी निवडणुकीत ही असणार भूमिका?

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

पक्ष बदलणाऱ्यांना अजित दादांचा सल्ला; आगामी निवडणुकीत दादा काय निर्णय घेणार बघा?

0 Comments: