Type Here to Get Search Results !

कवींनी आभासी कविता लिहू नये, कविता आत्म्यातून आली पाहिजे: डॉ विठ्ठल वाघ

 

पुणे, दि. १२ (चेकमेट टाईम्स): राजेंद्र वाघ यांच्या “निळे निळे गं आभाळ.. झालं काळ काळ, चल पावसात जाऊ, भिजू पावसात” या कवितेने सुरुवात झालेल्या ऑनलाइन काव्यस्पर्धेच्या निकाल कार्यक्रमात बोलताना डॉ विठ्ठल वाघ यांनी कवींना एक मोलाचा सल्ला दिलाय. ते म्हणाले, कवींनी आभासी कविता लिहू नये. ‘र’ ला “र” आणि ‘ट’ ला “ट” अशी कविता होत नाही. कविता आत्म्यातून आली पाहिजे. या स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकांच्या कवींच्या कविता “गदिमा कविता महोत्सवात” सादर करण्यात येतील. या कवींचा सन्मान म्हणून गदिमांच्या नावाने पारितोषिक दिले जाईल.

 

महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धा आयोजन करण्यात आली होती. यात राज्यभरातुन आलेल्या १४७ कविता परीक्षकांच्या मार्फत निवडण्यात आल्या. पाऊस आणि निसर्ग या विषयावर कविता मागविण्यात आल्या होत्या. परिक्षकांनी आलेल्या कवितेतून पाच पारितोषिक विजेते निवडले. या स्पर्धेचा निकाल ११ जुलै रोजी ऑनलाइन पध्दतीने लांडेवाडी येथील सभागृहात जाहीर करण्यात आला. त्यात


प्रथम क्रमांक डॉ.नीलम गायकवाड,

द्वितीय क्रमांक माधुरी ठाकूर,

तृतीय क्रमांक सुरेश कंक,

चतुर्थ क्रमांक वर्षा बालगोपाल, मंजुषा कौटकर आणि

पाचवा क्रमांक मीनाक्षी पाटोळे आणि शिल्पा जोशी यांना विभागून देण्यात आला आहे.

 

याप्रसंगी कविवर्य डॉ.विठ्ठल वाघ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, गझलकार नितीन देशमुख, कवी भरत दौंडकर, प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांनी कवींनी कविता कशी लिहावी, शब्द कसे असावेत, आशय कसा असावा, कविता सादरीकरण कसे असावे याबाबत कवींना बहुमोल मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमात डॉ. रोहिदास आल्हाट, मसाप भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, बांधकाम व्यावसायिक सुदाम मोरे, लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षा सुरेखा साबळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कवी पुरुषोत्तम सदाफुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून केली. महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. सूत्रसंचालन आचार्य दिगंबर ढोकले यांनी केले. तर आभार डॉ. सुरेखा साबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयूर साठे व मधुर साठे यांनी परिश्रम घेतले.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.