Type Here to Get Search Results !

मतदारांनी खऱ्या अर्थान कामे करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे; ज्येष्ठ नागरिकांची भावना

 

पुणे, दि. १९ (चेकमेट टाईम्स): दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी असतील, की अटलबिहारी वाजपेयी, मतदारांना डोळे झाकून ठराविक ठिकाणी मतदान करण्याची सवय जडली आहे. ती सवय वाईट आहे असे नाहीई, मात्र मतदारांनी खऱ्या अर्थाने काम कोण करतोय हे देखील पाहिले पाहिजे. उगाच आपला माहितीचा चेहरा, ओळखीचा माणूस, दहाव्याला आणि लग्नाला येणारा नेता असला म्हणून त्याला मतदान करण्यापेक्षा समाजात राहून, समाजाची गरज ओळखून काम करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना मतदारांनी प्राधान्य दिले पाहिजे असे मत आज एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केले.

 सुजाता दत्तात्रय झंजे यांच्यावतीने महिलांसाठी खेळ पैठणीचा "होम मिनिस्टर" आयोजन; हजारो महिलांचा सहभाग

निमित्त होते, वारजे माळवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता नारायण झंजे यांच्या पत्नी सुजाता दत्ता झंजे आणि उद्योजक राहुल रामचंद्र वांजळे यांच्या पत्नी शोभा राहुल वांजळे यांच्या वाढदिवसाचे. सुजाता झंजे आणि शोभा वांजळे यांच्या वाढदिवनिमित्त खानापूर, सिंहगड रोड, डोणजे, उत्तमनगर, वारजे, शिवणे, कोंढवे धावडे येथील सात ठिकाणच्या वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठांना स्नेह भोजन, मिष्ठान्न, फलाहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी सात ठिकाणच्या जवळपास ४०० वृद्धांनी झंजे आणि वांजळे यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये ज्येष्ठांनी त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली.

 पाणी वाचवा, झाडे लावा; वाढदिवसानिमित्त दत्ता झंजे यांचे आवाहन

तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी असल्याचेही हे ज्येष्ठ नमूद करतात. तेव्हा भेळीच्या पोत्यावर निवडणुका व्हायच्या, कार्यकर्ते इमानदार होते आणि नेत्यांना जनतेची जाण होती. आता मात्र नगरसेवक हा त्या भागाचा सेवक नसून मालक असल्यासारखे वागत असल्याचे दिसते. त्यामुळे मतदारांनी सालाबादप्रमाणे मतदान करण्याचा पराक्रम न करता, खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या आणि तळागाळातील उमेदवारांना मतदान केले पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांच्या अनुभवातून आलेले बोल ऐकताना प्रत्येकजण स्तब्ध होऊन ऐकताना दिसत होता.

 दुसऱ्या शिकवी तत्वज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण; रामभाऊ बराटे यांचा लोकप्रतिनिधींना टोला?

यावेळी दत्ता झंजे, राजीव पाटील, राहुल वांजळे, राजकुमार गुप्ता, अमित देवकर यांच्यासह झंजे आणि वांजळे मित्र परिवार उपस्थित होता. दत्ता झंजे यांच्या पत्नी २०१७ च्या निवडणुकीत वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक ३२ मध्ये कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या. चार उमेदवारांचा प्रभाग आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने सुजाता झंजे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर शांत न बसता, झंजे परिवाराने आपला जनसंपर्क कायम ठेवलं असून, विशेषतः गणेशपुरी, न्यू अहिरेगाव, रामनगर परिसरात झंजे परिवाराचा घराघरात संपर्क असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर येऊ घातलेल्या २०२२ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत सुजाता दत्ता झंजे कडवे आव्हान देतील याबाबत शंका नसल्याचा विश्वास उपस्थित झंजे समर्थकांनी व्यक्त केला.

 गणपती विसर्जन मिरवणुकीतील असे डान्स तुम्ही क्वचितच पाहिले असतील

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.