Type Here to Get Search Results !

बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्या हायवेच्या कोल्हापुरी हॉटेलवर धाड; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

 

वाकड, दि. ३१ (चेकमेट टाईम्स): मुंबई बेंगलोर हायवेवर असलेल्या हॉटेल कोल्हापुरी व्हेज - नॉनव्हेज मध्ये परमिट रूम – बिअर बार’चा कोणताही वैद्य परवाना नसताना, स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करत, तब्बल ६ लाख ४६ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात सामाजिक सुरक्षा विभागाला यश आले आहे.

 राष्ट्रवादीच्या महिलांनी केले खडकवासल्यातील बेकायदेशीर दारू धंदे उध्वस्त

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई बेंगलोर महामार्गावर निंबाळकर नगर, ताथवडे मध्ये असलेल्या हॉटेल कोल्हापुरी व्हेज – नॉनव्हेज मध्ये विनापरवाना देशी विदेशी मद्याच्या बाटल्या ग्राहकास विक्री केल्या जात असल्याबाबत सामाजिक सुरक्षा विभागास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त डॉ प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अनिल महाजन, जालिंदर गारे, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, सोनाली माने यांच्या पथकाने शुक्रवार दि. ३० जुलै २०२१ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून सदरील माल जप्त केला आहे.

 शेणात लपवून ठेवलेले दारूचे कॅन महिलांनी केले उध्वस्त

विनापरवाना देशी विदेशी दारूची साठवणूक करणे, त्याची ग्राहकांना विक्री करत असल्याप्रकरणी हॉटेल कोल्हापुरी व्हेज – नॉनव्हेजचा मालक अशोक मोहनलाल चौधरी (वय. ३३ रा.पवनानगर, चिंचवडगाव) आणि व्यवस्थापक प्रकाश विलास गायकवाड (वय.२४ रा. ताथवडे, मुळशी) यांच्याविरोधात वाकड पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, १ हजार २०० रुपये रोख रकमेसह, ६ लाख ४५ हजार ७५५ रुपये किमतीच्या देशी विदेशी मद्याच्या बाटल्या असा ६ लाख ४६ हजार ९५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अशाप्रकारे विनापरवाना बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

 गाव तिथे बिअर बार, दारू बंदी उठवणार, गरिबांना सवलतीत दारू

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.