Headlines
Loading...
सिंहगड रस्त्यावर तरुणी आढळली मृतावस्थेत; गळा दाबून खून केल्याची शक्यता

सिंहगड रस्त्यावर तरुणी आढळली मृतावस्थेत; गळा दाबून खून केल्याची शक्यता

 

पुणे, दि. २१ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने धायरी परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणीचा गळा दाबून खून केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.

 

सिंहगड रस्त्यावर मित्रानेच केला डोक्यात दगड घालून मित्राचा खून; मित्र फरार


याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा अजय निकाळजे (वय १९, वेंकटेश्वरा सोसायटी, धायरी फाटा, वडगाव खुर्द, पुणे) असे मृत तरुणीचे नाव असून, तिने नुकताच प्रेमविवाह केला होता अशी माहिती मिळते आहे. प्रेमविवाह केलेल्या तिच्या प्रियकराने तर खून केला नाही ना? असा संशय व्यक्त केला जात असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.

 

सिंहगड रस्त्यावर आढळली बॉंब सदृश वस्तू; रणगाड्याची गोळी असल्याची प्राथमिक माहिती


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दिशा आणि तिचा प्रियकर अजय दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. जानेवारी महिन्यात त्यांनी प्रेमविवाह केला होता. ते नुकतेच धायरी परिसरात भाड्याच्या खोलीत राहायला आले होते. अजय मिळेल ते काम करत होता. दिशा’चा मृतदेह आढळून आला असला तरी अजय आढळून आलेला नसल्याने त्याच्यावर संशयाची सुई वळते आहे. दिशा’च्या गळ्यावर व्रण असल्याने तिचा गळा दाबून खून झालेला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल. याबाबत सिंहगड रोड पोलीस तपास करत आहेत.


वडगांव पुलाजवळ पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून; तिन चिमुरड्यांचे छत्र हरपले 


माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


0 Comments: