Type Here to Get Search Results !

रमेश वांजळे समर्थक मारुती किंडरे यांच्यावर भाजपा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी

 

पुणे, दि. १९ (चेकमेट टाईम्स): खडकवासला विधानसभा मतदार संघाचे सोनेरी आमदार स्व. रमेश वांजळे यांचे कट्टर समर्थक असलेल्या उत्तमनगर मधील मारुती मुरलीधर किंडरे यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारत आमदार भिमराव तापकीर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यांनंतर त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान पाहता भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मारुती किंडरे यांना निवडीचे पत्र दिले.


 पुण्यातील मैत्री’चे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार उद्घाटन


मारुती किंडरे हे उत्तमनगर ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून, २००५ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते किंडरे यांना “महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार” हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या नावावर असे अनेक पुरस्कार असून, त्यांच्या कामाची शैली पाहता सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचे जवळचे विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून मारुती किंडरे यांचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातून किंडरे यांना दिल्या गेलेल्या या जबाबदारीमुळे खडकवासल्यात भाजपा आणखीन मजबूत होईल अशी खात्री व्यक्त केली जात आहे.

 


माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.