Type Here to Get Search Results !

वाढत्या थंडीत उघड्यावर वास्तव्य करणाऱ्यांना मनसेचा उबदार हात

 


पुणे, दि.30 (चेकमेट टाईम्स): गेल्या काही दिवसांमध्ये पारा एकदम खाली गेला आहे. दररोज हवेतील गारवा वाढतोय आणि याच वाढत्या थंडीत उघड्यावर वास्तव्य करणाऱ्यांना होत असलेल्या थंडीचा त्रास लक्षात घेता मनसेने उबदार हात दिलाय. विशेष म्हणजे ही मदत करत असताना, इतरांप्रमाणे हा आपला मतदार आहे का? हे न पाहता, “हा गरजवंत आहे आणि हा आपला देशबांधव आहे” हे पाहून ही मदत करण्यात आली.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारजे पुणे आणि शिवज्योत प्रतिष्ठान वारजेच्या संयुक्त विद्यमाने, संत रोहिदास विचारमंच वारजे’चे संथापक अध्यक्ष कुंडलिक नाना सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली फुटपाथवर वास्तव्य करणाऱ्या गरजवंत बांधवांना कानटोप्यांचे वाटप करून हा उबदार हात देण्यात आला. यावेळी शेखर बंगले, स्वप्नील जाधव, विनोद ढवारे, स्वराज पाटेकर, सुमित गरुड, राज बडदे, प्रशांत मोरे, अकबर शेख आदी उपस्थित होते. मनसेच्या स्थापनेपासून वारजे भागातून मनसे सोबत असलेले कट्टर मनसैनिक प्रविण सोनावणे यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.