Type Here to Get Search Results !

२०२१ सालचा बेस्ट ऑफिशियल बॉडी बिल्डर अवॉर्ड नचिकेत हरपळे यांना; मिस्टर पुणे २०२१ संपन्न


 

पुणे, दि.२१ (चेकमेट टाईम्स): २०२१ सालचा बेस्ट ऑफिशियल बॉडी बिल्डर अवॉर्ड (Official Body Builder Award) नचिकेत हरपळे (Nachiket Harpale) यांना देण्यात आला. तर मिस्टर पुणे २०२१ (Mr. Pune 2021) चा किताब तौसिफ मोमिन (Tausif Momin) याने पटकावला, त्याचबरोबर मेन्स फिजीकचा विजेता ख्रिस जॉन  (Chris John) ठरला, स्पर्धेत उपविजेता मिथुन ठाकूर (Mithun Thakur), तर बेस्ट पोझर ज्ञानेश्वर सोनवणे  (Dnyaneshwar Sonawane)झाला. फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिजीक स्पोर्ट्स (Federation of Bodybuilding and Physical Sports) पुणे यांच्या वतीने व माय फिटनेस (My Fitness) व चिदानंद प्रतिष्ठान (Chidanand Pratisthan) यांच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धांना तरुणांची एकाच गर्दी लोटली होती.

 

पुण्यातील मानाची व प्रतिष्ठेची स्पर्धा असल्यामुळे अनेक नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. एकूण सात वजनी गटात ही स्पर्धा झाली तर मेन्स फिजीक हा खुला गट होता. मि पुणे विजेत्यास रोख ३१ हजार रुपये, उपविजेत्यास रोख १५ हजार रुपये, बेस्ट पोझर ५ हजार रुपये, तर प्रत्येक ग्रुप मध्ये २२ हजार ५०० रुपये देण्यात आले. स्पर्धेत मि वर्ल्ड महेंद्र चव्हाण, आकाश आवटे, आदिती बम्ब या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

 


या स्पर्धेचे उदघाटन विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ (Leader of the Opposition Deepali Dhumal) यांच्या शुभहस्ते, तर माय फिटनेसचे सूरज रोनाड (Suraj Ronald) आणि राहील विराणी, गणेश दांगट यांच्या उपस्थितीत तर फेडरेशनचे अध्यक्ष नंदू कळमकर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. बक्षीस वितरण शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, नगरसेविका वृषाली चौधरी, दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष नंदू कळमकर, उपाध्यक्ष मनिष धुमाळ, सुहास दांगट, सेक्रेटरी दिलीप धुमाळ, महेश गणगे, खजिनदार मयूर मेहेर, बंटी निधाळकर, सत्यजित तटकरे, नेहा धुमाळ, नचिकेत हरपळे, आरती माळवदे यांनी पंच म्हणून तर साहिल धुमाळ व महेश सोनी यांनी सूत्रसंचालन केले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.