Type Here to Get Search Results !

पुणे: या आठवड्यातले टॉप ५ कोरोना हॉट स्पॉट; पहा आठवड्यात किती तपासले, आढळले, सोडले आणि मृत्यू झाले

 

पुणे, दि.२७ (चेकमेट टाईम्स): पुण्यासह महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात ओ मायक्रॉन आपले अस्तित्व दाखवत असताना, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून आपल्या भागात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. पुण्यात सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ पासून रविवार दि. २६ डिसेंबर २०२१ दरम्यान एकूण ४२ हजार ५९१ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यात ७३६ जण कोविड पॉजीटीव्ह आढळले असून, ६२३ रुग्णांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. सद्यस्थितीला ९८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आठवड्याभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात एकूण १५ क्षेत्रीय कार्यालये असून, त्यातील टॉप ५ कोरोना हॉट स्पॉट क्षेत्रीय कार्यालये कोणती याचा विचार केला तर, या आठवड्यात औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाची हद्द आघाडीवर आहे. औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत या आठवड्यात तब्बल १३७ कोविड पॉजीटीव्ह आढळले आहेत. स्मार्ट पुण्याचा स्मार्ट विकास होण्यासाठी या क्षेत्रीय कार्यालय हद्दीची सर्वात अगोदर निवड झाली होती. मात्र त्या प्रमाणात या क्षेत्रीय कार्यालयाचे किती स्मार्ट कामकाज सुरु आहे हे यातून स्पष्ट होते आहे.

 

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ते हडपसर क्षेत्रीय कार्यालय. हडपसर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत देखील कोविड पॉजीटीव्ह रुग्णसंख्येची शतकी खेळी असून, इथे तब्बल १०४ पॉजीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या आठवड्यातले शतकवीर क्षेत्रीय कार्यालयांचा बहुमान हा औंध आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयांना मिळाला आहे.

 

त्याखाली तिसऱ्या क्रमांकावर आहे ते नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय. नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कोविड पॉजीटीव्ह रुग्णसंख्येचे शतक थोडक्यात हुकले असून, इथे ९२ रुग्ण हे कोविड पॉजीटीव्ह आढळले आहेत.

 

चौथ्या क्रमांकावर आहे ती कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाची हद्द, या पुण्याच्या महापौरांचे निवासस्थान असलेल्या कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आठवड्याभरात ६१ कोविड पॉजीटीव्ह रुग्णांची भर पडली आहे.

 

तर पाचव्या क्रमांकावर आहे ते वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, पुण्याच्या विरोधी पक्षनेत्यांचे निवासस्थान असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ५८ कोविड पॉजीटीव्ह रुग्णांची भर पडली आहे.

 

एकूणच आठवड्याभरात केलेल्या तपासण्यांच्या प्रमाणात पाहायला गेले तर पॉजीटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या २ टक्क्यांच्या वर नसली तरी नागरिक आणि प्रशासन गाफील राहिल्यास कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होण्यास वेळ लागणार नाही. सद्यस्थितीला अनेक ठिकाणी मास्कचा वापर होताना दिसत असला तरी, अनेकांचे कोरोन प्रतिबंधक लसींचे दोन दोन डोस झाले असल्याने, त्यांच्यात अति-आत्मविश्वास आला आहे. बहुतांशी कार्यालयांमधून सॅनिटायझर गायब झालेली असून, स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. या सर्व परिस्थितीला आता प्रशासन कसे सामोरे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

777777777777777

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.