Type Here to Get Search Results !

वारजे, शिवणे, उत्तमनगर मधील अनधिकृत बांधकामांवर आली संक्रांत; ऐन संक्रातीला पालिकेचा हातोडा

 

पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi), शिवणे (Shivane) आणि उत्तमनगर (Uttam Nagar) मधील एकूण ४ अनधिकृत बांधकामांवर (Illeagal Construction) पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून (Pune Corporation Building Permission Department) निष्कासन कारवाई करण्यात आलीये. यामध्ये साधारण साडे पाच हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या  (JCB) सहाय्याने मोकळे करण्यात आले. सदरील अनधिकृत बांधकाम हटविणे संदर्भात बांधकाम विकास विभागाकडून संबधितांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

 

यामध्ये प्रामुख्याने उत्तमनगर मधील मासे आळी भागातील एक फुटिंग मध्ये असलेले बांधकाम, कोपरे गाव रस्त्यावर असलेले प्लिंथ लेवल बांधकाम, शिवणे मधील कामठे वस्ती भागातील एक व्यावसायिक शेड आणि वारजे माळवाडी दिगंबरवाडी शाळेच्या परिसरातील एक फुटिंग लेवल बांधकाम अशी ४ बांधकामे मिळून ५ हजार ५०० चौरसफुट अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करण्यात आली.

 

यावेळी उत्तमनगर भागातील घरगुती स्वरूपात स्वत:ला राहण्यासाठी सुरु असलेल्या बांधकामावरील (Residencial Project) कारवाईला उत्तमनगरचे माजी सरपंच सुभाष नाणेकर (Ex Sarpanch Subhash Nanekar) यांनी विरोध करत, कारवाई थांबवण्याची विनंती केली. गोर गरीब सामान्य जनता कष्टाने स्वत:ला राहण्यासाठी घर बांधत असतील तर पालिकेने अशा बांधकामांना अभय दिले पाहिजे अशी भूमिका नाणेकर यांनी मांडली.

 

ही कारवाई बांधकाम विकास विभाग झोन 3 (PMC Zone 3) चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे (Executive Engineer Shrikant Waydande), उपअभियंता देवेंद्र पात्रे (Deputy Engineer Devendra Patre)यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सचिन जावळकर (Junior Engineer Sachin Jawalkar), सतीश शिंदे (Junior Engineer Satish Shinde) यांनी पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या (Department of Encroachment) पोलीस बंदोबस्तात, पालिकेचे बिगारी, गॅस कटर, जेसीबी, ब्रेकर यांच्या सहाय्याने पूर्ण केली. तर भविष्यात या कारवाई आणखीन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक :  https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक :  https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.