Type Here to Get Search Results !

पीएमपीएमएल मध्ये लसीकरण पास’च्या सक्तीमुळे विद्यार्थ्यांचे हाल; वाहकही झाले त्रस्त


 

पुणे, दि.२१ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Pune Public Transport) असलेल्या पीएमपीएमएल (PMPML) मध्ये “कोरोना प्रकरणांच्या वाढत्या परिस्थितीमध्येही, आम्हाला सर्वोत्तम सेवा देणे सुरू ठेवायचे आहे. आमच्या प्रवाशांना सुरक्षित वाटेल व त्यांचा प्रवास सुरक्षित होवो याची खात्री घेण्यासाठी आम्ही प्रवाशांना त्यांचे कोविड-१९ (Covid 19) चे ‘पूर्ण’ लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination Certificate) सादर करणे अनिवार्य करत आहोत.” असे आदेश पारित केले. मात्र पीएमपीएमएल’च्या या आडमुठ निर्णयामुळे काही विद्यार्थ्यां’सह (Traveler Students) बस वाहकांना (PMPML Bus Conductor) मात्र त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) बसने प्रवास कराल तेव्हा तुम्हाला कोविड-19 लसीकरण डोस प्रमाणपत्रे (Covid-19 vaccination certificate) किंवा राज्य सरकारने जारी केलेला 'युनिव्हर्सल पास' (Universal Pass) दाखवावे लागतील. सार्वजनिक वाहतूक संस्था 17 जानेवारीपासून फक्त पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच  बसण्याची परवानगी देईल.

 

“कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे सर्वाना बंधनकारक करण्यात आलेले नाही किंवा तसा अधिनियम पारित करण्यात आलेला नाही.” मात्र दोन डोस लसीकरण झालेले असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (Maharashtra Govt Covid 19 Guidlines), मॉल्स (Mall), चित्रपटगृहे (Cinema Hall), सरकारी कार्यालये (Govt Offices) आणि इतर सार्वजनिक ठिकाणी (Public Place) केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच परवानगी आहे. लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकांना सद्यस्थितीला अनेक ठिकाणी प्रवेश नाकारला जातो आहे. तोच नियम PMPML मध्ये देखील लागू करण्यात आलेला आहे.

 

सर्व बस वाहकांना प्रवाशांची प्रमाणपत्रे तपासून त्यानंतरच बसमध्ये चढण्याची परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहक त्याची अंमलबजावणी देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक वाहकांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ लागली आहे. (PMPML Passengers in Covid) प्रसंगी प्रवासी आणि वाहकांमध्ये कटकटी होऊ लागल्या आहेत. काही वाहक सौजन्याची भूमिका घेतात, त्याचवेळी काही मुजोर वाहक प्रवाशांशी हुज्जत घालून बस रस्त्यात “थांबा नसलेल्या ठिकाणी थांबवून” प्रवाशाला रस्त्याच्या मध्येच कुठेही उतरवत आहेत. त्यातच अशा मुजोर वाहकांना “विद्यार्थी” दिसले तर त्यांची अरेरावी तर आणखीन वाढत आहे. त्यामुळे दहावी आणि पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येऊ लागली आहे.

 

विशेषतः बहुतांशी शाळा महाविद्यालयांमध्ये महत्वाचे वर्ष असल्याने दहावी आणि बारावी’चे वर्ग घेण्यात येत आहेत. मात्र नुकतेच १५ वर्षांपुढील विद्यार्थ्यांना लसीकरण सुरु करण्यात आलेले असल्याने, त्यांच्याकडे “पूर्ण लसीकरण प्रमाणपत्र अर्थात दोन लसी घेतल्याचे प्रमाणपत्र कसे असू शकते?” किती टक्के विद्यार्थ्यांचे एक लसीकरण झालेले असेल? सराव परीक्षा सुरु असताना, किती विद्यार्थ्यांना लगेच लसीकरण करणे शक्य आहे? हा साधा प्रश्न पीएमपीएमएल’च्या अधिकाऱ्यांना पडू नये का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

 

तर काही दहावीच्या विद्यार्थ्यांचे आताचे वय हे १५ वर्षे पूर्ण झालेलेच नाही. अनेक विद्यार्थी पुढील काही महिन्यांमध्ये १५ वर्षे पूर्ण होतील. त्या विद्यार्थ्याची “कोविन संकेतस्थळावर” नोंदणीच होत नाही. मग त्यांना दोन काय एकही लस घेता येणार नाही, किमान अशा विद्यार्थ्यांना प्रवास करण्यापासून अडवू नका, अशा सूचना देखील अधिकाऱ्यांना देता आल्या नाहीत का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून, पीएमपीएमएल’च्या वातानुकुलीत दालनात बसून, निर्णय घेणाऱ्यांनी किमान आपल्या वाहकांची भूमिका जरी जाणून घेतली असती, तरी संयुक्तिक ठरले असते, असे मत नाव ना प्रसिद्ध करण्याच्या अटीवर वाहकांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.

 

एकूणच पीएमपीएमएल प्रशासनाने दोन लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय प्रवास करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला असताना, त्यातील बारकावे पुन्हा अभ्यासण्याची गरज स्पष्ट होते आहे. तर पुण्यात सत्ताधारी असलेल्या भाजपा’च्या लोकप्रतिनिधींनी देखील नागरिकांच्या होणाऱ्या या गैरसोयीकडे वेळीच लक्ष न दिल्यास प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा लसीकरण प्रमाणपत्रांची अंमलबजावणी कशी करायची याचा सारासार अभ्यास होणे गरजेचे झाले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.